घरताज्या घडामोडीरियाला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, सीबीआयने लावला 'हा' आरोप!

रियाला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, सीबीआयने लावला ‘हा’ आरोप!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नव नवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी रिया विरोधात तक्रार केल्यानंतर अनेक यंत्रणा कामाला लागल्या. या सर्वच यंत्रणा जोमाने काम करीत आहेत. आज शुक्रवारी (४ सप्टेंबरला) एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल ममिरांडाच्या घरी धाड टाकली आहे. यादरम्यान एनसीबीच्या टीमने शौविकला चौकशीसाठी सोबत नेलं आहे. तर दुसरीकडे सीबीआय रिया चक्रवर्तीला लवकरच अटक करण्याची शक्यता आहे.

तपास यंत्रणांना रियाच्या मोबाइलमधून डीलीट करण्यात आलेले मेसेज मिळाले होते. या मेसेजमध्ये रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यात अमली पदार्थाबाबत संवाद होते. रियाचा भाऊ शौविकचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

- Advertisement -

सुशांत – रिया टेरेसवर जाऊन स्मोक करायचे

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार सीबीआयला दिलेल्या जबाबात श्रुतीने सांगितले की, रिया आणि सुशांत दोघेही एकत्र गांजा घेत असत. सुशांत आणि रिया बऱ्याचदा गांजा ओढण्यासाठी टेरेसवर जायचे. रिपोर्टनुसार रिया आपला भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडसोबत सुध्दा स्मोक करायची. श्रुती मोदी असेही म्हणाले की, ड्रग्स सुशांतच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता. तो त्याच्या आधीन गेला होता. मलाही या सर्व गोष्टींचा भाग बनण्याची जबरदस्ती करण्यात आली.

चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसेच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.


हे ही वाचा – ‘९ तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा’; कंगनानं दिलं Challenge


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -