Sushant Death Case : फॉरेन्सिक अहवाल लीक; कुटुंबियांनी केली तक्रार दाखल

sushant singh rajput
सुशांतच्या शरीरात विषाचा अंशही नाही; व्हिसेरा रिपोर्टचा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष एम्सने सीबीआयला सादर केलेल्या अहवालात समोर आला आहे. मात्र एम्सच्या (AIIMS) या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक अहवाल लीक केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांकडून हे तक्रार पत्र मिळाले असून यात त्यांनी हा आरोप केला आहे.

काय म्हटले आहे या पत्रात

डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आरोप, त्याच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे. तसेच, एम्सने सादर केलेला हा अहवाल अपुऱ्या पुराव्यांवर आधारित आहे. या रिपोर्टची प्रत मागूनही कुटुंबियांना दिली जात नसल्याचे देखील या तक्रारीत म्हटले आहे. फॉरेन्सिक टीमचे मुख्य हा रिपोर्ट अजूनही सादर करत नाहीl. केवळ कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. तर, ज्या अहवालात सुशांतच्या मृत्यूची वेळ देखील नोंदवली नाहीय, त्यावर आधारित हा रिपोर्ट निष्कर्षावर कसा पोहचू शकतो, असा प्रश्न सुशांतच्या कुटुंबियांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या मृत्यूबद्दलचा अहवाल सीबीआयकडे सादर केला होता. या अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी हत्येची शक्यताही फेटाळून लावली आहे.

हेही वाचा –

गुगल मॅपवर दिसणार कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र