घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: CBI टीम मीतू सिंह सोबत सुशांतच्या घरी दाखल, पुन्हा...

Sushant Suicide Case: CBI टीम मीतू सिंह सोबत सुशांतच्या घरी दाखल, पुन्हा सीन रिक्रिएट करणार!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील ड्रग्जच्या संबंधित रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना शुक्रवारी एनसीबीने अटक केली. तसेच आज सीबीआय टीम सुशांतच्या मुंबईतील वांद्र्यातील घरी पोहोचली आहे. या सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मीतू सिंह पण आहे. तसेच दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे डॉक्टर देखील सीबीआय टीमसोबत आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार यावेळेस पुन्हा एकदा सीबीआय टीम सीन रिक्रिएट करणार आहेत. त्या दिवशी नेमके काय घडले याची माहिती मिळण्यासाठी पुन्हा सीन रिक्रिएट केला जाणार आहे. यादरम्यान सिद्धार्थ पिठानी, नीरज सुशांतच्या घरी उपस्थित असतील.

यापूर्वी देखील सीबीआयच्या टीमने सुशांतच्या घरी दोन वेळा क्राइम सीन रिक्रिएट केला होता. त्यावेळेस सीबीआयसोबत फॉरेसिंग एक्सपर्ट होते. यावेळेस एम्सचे डॉक्टर आहेत. दरम्यान सुशांतची आत्महत्येच्या वेळी घटनास्थ्ळी सिद्धार्थ, केशव आणि नीरज घरी होते आणि सुशांतच्या आत्महत्येची माहिती समजताच मीतू सिंह घटनास्थळी पोहचली होती.

- Advertisement -

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात आणण्यात आले आहे. आज शौविक आणि सॅम्युअलला कोर्टात हजर करण्यापूर्वी दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.


हेही वाचा – कंगनानं स्वत:चं ट्विटर हँडल स्वत: वापरावं, राजकीय पक्षांना हाताळायला देऊ नये – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -