घरताज्या घडामोडीसुशांतच्या आत्महत्येस जबाबदार कोण? बॉलीवूडची घराणेशाही? की प्रेमाचा पाश?

सुशांतच्या आत्महत्येस जबाबदार कोण? बॉलीवूडची घराणेशाही? की प्रेमाचा पाश?

Subscribe

बॉलीवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला एक महिन्याहून अधिक कालावधी झाला असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे गूढ मात्र कायम आहे. यादरम्यानच्या काळात बॉलीवूडमधील घराणेशाहीने सुशांतचा बळी घेतल्याचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सूचनाही दिल्या. पण एवढ्या सगळ्या कालावधीत सुशांतच्या कुटुंबीयांकडून मात्र यावर मौन बाळगण्यात आले होते. पण मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करत तिच्याविरोधात पाटणा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. सुशांतच्या वडिलांच्या या आरोपामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलीवूड मधील घराणेशाहीला जबाबदार ठरवणाऱ्यांना मात्र धक्का बसला आहे.

- Advertisement -

सुशांतच्या वडिलांनी रियावर १६ गंभीर आरोप केले आहेत. यामुळे रियाच्या अडचणीत वाढ झाली असून तिला अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी रियाची धावपळ सुरू आहे. मंगळवारी रात्री रियाने तिचे वकील सतीश मानशिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, १४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सुशांतने आत्महत्या का केली असावी असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. त्यातून मग अभिनेत्री कंगणा राणावत हीने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलीवूडमधील घराणेशाही जबाबदार असल्याचे विधान करत नवीन वादाला तोंड फोडले. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेकजण कंगणाचे समर्थन करण्यासाठी पुढे सरसावले. यात दिग्दर्शक अनुराग कश्यप, शेखर कपूर, शेखर सुमन यांच्यापासून अनेक दिग्गज सहभागी झाले होते. त्यामुळे झगमगाटामागचा बॉलीवूडचा काळा चेहरा समोर आला होता. इंड्स्ट्रीबाहेरील कलाकारांना बॉलीवूडमधील दबंग घराणेशाही कशी नैराश्यात ढकलते यावर अनेकांनी आपले अनुभव शेअर केले होते. त्यामुळे सुशांतला बॉलीवूडमध्ये काम मिळू नये यासाठी सक्रिय असणाऱ्या टीमचा पर्दाफाश झाला होता. त्यामुळे बॉलीवूडमध्ये दोन गटही पडले. त्यादृष्टीने मुंबई पोलीस तपासही करत होती. त्यासाठीच निर्माते आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी व सुशांतच्या संपर्कातील व्यक्तींच्या चौकशा करण्यात येत होत्या. याचदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम यांनीही या वादात उडी घेत सुशांतसाठी न्यायालयात लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे हायप्रोफाईल प्रकरण लवकरच मार्गी लागेल व सुशांतला न्याय मिळेल असे त्याच्या चाहत्यांना वाटले होते.

तर दुसरीकडे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीनेदेखील गृहमंत्री अमित शाह यांना सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआयने तपास करावा अशी विनंती केली. यादरम्यान अभिनेता शेखर सुमन यांनीही बॉलीवूडमधली घराणेशाही बाहेरून येणाऱ्यांचा कशा प्रकारे छळ करते यावर भाष्य केले होते. सुशांत हा तरुण व उमदा कलाकार असल्याने त्याचे देशातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. यामुळे सुशांतच्या प्रत्येक बातमीवर जगाचेच लक्ष होते. पण ज्यावेळी बॉलीवूडमध्ये हे सर्व नाट्य चालू होते त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीय मात्र शांत होते. हे खटकणारे होते. त्यानंतर मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयां विरोधात पाटणा येथे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्यात त्यांनी रियावर १६ गंभीर आरोप लावले आहेत. यामुळे सुशांतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करणारे मात्र हैराण झाले आहेत.

- Advertisement -

रियावर करण्यात आले आहेत हे १६ आरोप

रियाला भेटल्यावरच सुशांतला मानसिक आजार जडल्याचे कळाले. त्याआधी तो नॉर्मल होता.

रियाने सुशांतच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतला.

सुशांतला चित्रपटाची ऑफर आल्यावर रिया त्यात स्वत:साठी मुख्य भूमिकेची मागणी

रियाने सुशांतचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, पैसे, दागिने लंपास केले. त्याचे आर्थिक शोषण केले.

रियाने सुशांतला औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर २०१९ मध्ये त्याला डेंग्यू झाल्याची अफवाही तिने पसरवली
रिया सुशांतला ब्लॅकमेल करायची.

सुशांतला केरळमध्ये ऑर्गेनिक शेती करायची होती. पण रियाने त्यास विरोध केला.

मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करेन अशी धमकीही रिया सुशांतला द्यायची

रियाने त्याला कुटुंबापासून दूर ठेवले

सुशांतने कुटुंबापासून दू राहावे म्हणून रियाने त्याचे सिम कार्डही बदलले होते.

तिने सुशांतचे विश्वासू कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून त्याजागी तिच्या ओळखीची माणसे नेमली.

रियाने सुशांतच्या बँक खात्यातील १५ करोड रुपये अनोळख्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केले.

सुशांत व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला बंधक बनवले होते. ते त्याला मानसिक रुग्ण बनवण्याचा प्रयत्न करत होते.

सुशांतने फोनवर रिया व तिचे घरातील लोक आपल्याला मेंटल हॉस्पीटलमध्ये भरती करतील अशी भीती वाटत असल्याचे वडिलांना सांगितले होते.

सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसाआधीच रिया त्याला सोडून गेली होती. पण जाताना तिने सुशांतच्या अनेक महागड्या वस्तू लंपास केल्या. त्यात लॅपटॉप, कॅश, दागिने, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, त्याची महत्वाची कागदपत्रांचा समावेश होता.

सुशांतच्या वडिलांनी रिया त्याला चुकीचे औषध देत होती असाही आरोप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -