घरताज्या घडामोडीSushant Singh Suicide Case: सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Sushant Singh Suicide Case: सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी गुरुवारी सीबीआयने याप्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही बिहार पोलिसांच्या संपर्कात आहोत असे सीबीआयचे प्रवक्ते यांनी म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीच्यासह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. CBI चे विशेष पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे. CBI जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर हे SIT लीड करतील. DIG गगणदिप गंभीर तपास मॉनिटर करतील.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिसानी याप्रकणात सुमारे ५० पेक्षा अधिक जणांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवून घेतलेले असून यामध्ये चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक तसेच सुशांतच्या जवळचे मित्र मैत्रीनीचा समावेश आहे.

मात्र मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरित्या तपास करीत नसल्याचा आरोप करून २५ जुलै रोजी सुशांतचे वडिल के.के. राजपुत यांनी बिहार पोलीसांकडे सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.या प्रकरणी पटना पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध फसवणूक, धमकी देणे, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाली मात्र त्यांनी मुंबई पोलिसांची कुठल्याही प्रकारची मदत न घेता मुंबईत तपास सुरु केला होता.

- Advertisement -

यावरून हे प्रकरण अधिकच तापले, त्यात अनेक राजकारण्यांनी मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. या गुन्ह्याचा तपासाठी मुंबई दाखल झालेले पटनाचे पोलीस अधीक्षक यांना होम कॉरंटाईन कऱण्यात आल्यानंतर तर या गुन्ह्याला राजकीय वळण लागले. हे सुरु असताना ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून सुशांतची मैत्रीण रिया हिच्यावर सुशांतच्या बँक खात्यावरील पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली होती. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन बिहार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आल्यामुळे हा गुन्हा केंद्रीय तपास यंत्रणेकडे सुपूर्द कऱण्यात यावा अशी मागणी करण्यात आली, अखेर बुधवारी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रना (सीबीआय)कडे देण्यात आले आहे. गुरुवारी या प्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून अधिसूचना मिळाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला असून आम्ही बिहार पोलिसाच्या संपर्कात असल्याचे सीबीआयचे प्रवक्ते यांनी म्हटले आहे.


हे ही वाचा – Sushant Singh प्रकरणावर बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे बोलतात, महाराष्ट्राचे DGP सुबोध जयस्वाल गप्प का?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -