Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर मनोरंजन गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया पहिल्यांदा आली समोर, म्हणाली सत्याचा विजय होईल

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया पहिल्यांदा आली समोर, म्हणाली सत्याचा विजय होईल

Mumbai
rhea chakraborty reacts first time after case filed against her in patna

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा येथे केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. यानंतर बिहार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता रिया चक्रवर्ती गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आली आहे. रिया चक्रवर्तीने एक व्हिडीओ जारी केला असून माझ्याबद्दल चुकिचं बोललं जात असल्याचं तिने म्हटलं आहे.

रिया चक्रवर्तीने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात ती म्हणतेय की, “माझा देवावर आणि न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि मला न्याय मिळेल. मीडियामध्ये माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. मी माझ्या वकीलाचा सल्ला घेत आहे. सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल.”

रिया चक्रवर्तीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंग यांनी मला अडकवण्यासाठी खोटे आरोप केले आहेत. यासह तिच्या खटल्याची पाटणा येथून मुंबई येथे बदली व्हावी कारण या खटल्याची मुंबईत यापूर्वी चौकशी सुरू आहे, अशी मागणी तिने केली आहे.

७ पानांच्या एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी रिया आणि त्याच्या कुटुंबीयांवर सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दुर केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, रियाने आपल्या मुलाशी संपर्क साधण्याचे प्रत्येक साधन बंद केले असल्याचा त्यांनी आरोप केला. या एफआयआरमध्ये रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी काढून घेतल्याचा आरोप आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here