घरमनोरंजनसुशांतच्या 'दिल बेचारा' चित्रपट ट्रेलरने मोडले 'हे' रेकॉर्ड

सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपट ट्रेलरने मोडले ‘हे’ रेकॉर्ड

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा ठरलेला दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर अखेर काल प्रदर्शित करण्यात आला. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाने बॉलीवूडसह देशभरात खळबळ माजली होती. वयाच्या ३४ वर्षी या कलाकाराने आपले जीवन संपवले असल्याने सर्वांनाचा धक्का बसला होता. त्यामुळे त्याची शेवटची कलाकृती ठरलेली दिल बेचारा या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा शिकार ठरल्याने सुशांतने आत्महत्या केल्याची चर्चा त्यांच्या मृत्यूनंतर होत असतानाच त्याच्या या अखेरच्या ठरलेल्या चित्रपटाने त्या स्टार किड्सच्या चित्रपट ट्रेलर्स पसंतील मागे टाकले आहे.

- Advertisement -

दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन २४ तासच झाले असताना आतापर्यंत २१ मिलियनहून अधिक व्ह्यूज याला मिळाले आहेत. तर ४ मिलियनहून जास्त लाईक्स या ट्रेलरला आहेत. यापूर्वी आलेल्या हृतिक रोशनच्या सुपर ३० चित्रपट ट्रेलरला १.४ मिलियन लाईक्स मिळाले होते. तर आलिया भट्टच्या राझी चित्रपटाला ३ लाखांहून अधिक लाईक्स होते. तसेच सारा अली खानच्या लव आज कल चित्रपटाला ६ लाख लाईक्स होते. तसेच वरुण धवनच्या स्ट्रीट डांसर ३ डी चित्रपटाला ९ लाख लाईक्स होते.

हेही वाचा –

महानगरच्या वृत्तानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -