सुशांतचे फोटो असलेले मास्क, चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली!

सध्या हे सुशांतचे फोटो आणि अनोखा संदेश असणारे मास्क सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल

Mumbai
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या घटनेला १० दिवसांहून अधिक काळ उलटून गेला आहे, पण तरीही त्यांच्या चाहत्यांना त्याचे सोडून जाणे हे सत्य स्वीकारणे अवघड आहे. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारला वेगवेगळ्या अंदाजात श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसमुळे त्याचे चाहते सुशांत सिंहच्या शेवटच्या भेटीला उपस्थित राहू शकले नाहीत. पण आता या महामारीच्या काळात त्याचे चाहते त्याला एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

View this post on Instagram

@sushantsinghrajput #sushantsinghrajput #missyou

A post shared by Devendra borana (@iamdevborana) on

त्याच्या काही चाहत्यांचे फोटो व्हायरल होत असून आहेत ज्यात ते सुशांतचा चेहरा असणारा मास्क लावलेले दिसताय. या मास्कवर सुशांत सिंह राजपूतचे फोटो दिसतेय. तर या फोटोसह चाहत्याने मास्कवर एक खास संदेशही लिहिला आहे. ”जिस्म से हारा हूं रूह तो सिर्फ एक परिंदा है, धड़कने चल रही हैं अभी भाई मेरी, अभी भी मेरे दिल में जिंदा है.” असे त्या संदेशात लिहिले आहे. सुशांतच्या चाहत्यांचे म्हणने आहे की, सुशांतला श्रद्धांजली वाहण्याचा हा एक मार्ग आहे, आणि अशाप्रकारचे मास्क इतर लोकांना देखील वाटण्याचा देखील आमचा प्रयत्न असणार आहे.

सध्या हे सुशांतचे फोटो आणि अनोखा संदेश असणारे मास्क सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सुशांतच्या अभिनय शैलीची छाप त्याच्या चाहत्यांच्या मनावरून अजून काही केल्या जात नसल्याने अजूनही त्याचीच चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसतेय.

अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती

छोट्या पडद्यावर ‘किस देश में है मेरा दिल’, ‘पवित्र रिश्ता’ या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘काय पो छे’ सुशांतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘राबता’, ‘पिके’, ‘छिछोरे’ या चित्रपटातून त्याने आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आणि बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले होते.


सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा उत्सव करणाऱ्यांना संजय राऊत यांच्या कानपिचक्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here