Sushant Singh Suicide प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड; सुशांतच्या डायरीची पाने गहाळ

अभिनेता सुशांत सिंग राजपूत

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा झाला आहे. सुशांत सिंह राजपूतची पर्सनल डायरी पहिल्यांदा समोर आली असून यामधील पाने फाटली असून काही पाने गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स नाऊ या न्यूज वेबसाईटने दिले आहे. या डायरीचा उल्लेख सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने केला होता.

टाइम्स नाऊजवळ सुशांत सिंह राजपूत यांची डायरी आहे. सुशांतच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले की, ‘डायरीमध्ये एक नाव आहे त्यानंतरची पुढची पाने फाटली आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी या डायरीची तपासणी केलेली नाही.’

सुशांत सिंह राजपूत याचा खास मित्र सिद्धार्थ पिठानीने टाइम्स नाऊला सांगितले की, ‘मुंबई पोलिसांनी माझ्यासमोर कोणतेही पान फाडलेले नाही. पोलिसांनी आम्हाला डायरी आणि नोटबुकबद्दल विचारले होते. आम्ही त्यांना सुशांतच्या २० डायऱ्या दिल्या होत्या.’

सुशांत सिंह राजपूत याचे कौटुंबिक वकील विकास सिंह यांनी टाइम्स नाऊसोबत बोलताना म्हणाले की, ‘या डायरीत अनेक महत्त्वाची माहिती असू शकते. ही आत्महत्या असो किंवा हत्या, पण ही डायरी सुशांतच्या डोक्यात काय चालले होते ते सांगू शकते.’ पुढे ते म्हणाले की, ‘सुशांतने आत्महत्या का केली आणि शिवाय कोण त्याला धमकी देत होते. तसेच डायरीची पाने फाटली होती. या गोष्टी हैराण करणाऱ्या आहेत. पण ही पाने कोणी फाडली आहेत?.’ विकास सिंह यांच्या म्हणण्यानुसार ‘सुशांतच्या बहिणीनेही ही फाटलेली पाने पाहिली आहेत.’

सिद्धार्थ पिठाने सांगितले की, ‘खोलीत काही पानांचे तुकडे पडले होते. मी ते तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही दाखवले होते. शिवाय ड्रॉवरमध्ये काही चिट्स देखील होत्या. पोलिसांनी याचे फोटो घेतले आहेत.’

दरम्यान सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, तिची आई संध्या चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सुशांत आणि रियाचे खास मित्र सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.