पवना धरणातील छोट्याश्या बेटावर व्हायच्या सुशांतच्या ड्रग्ज पार्ट्या!

sushant singh rajput and sara ali khan
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान

अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास ड्रग्ज अगलने केला जात आहे. या तपासात आता एनसीबीने दावा केला आहे की, सारा अली खान, सीमोन आणि रकुल यांची नावं ड्रग्ज प्रकरणात पुढे आली आहेत. सुशांतच्या फार्म हाऊसवर किंवा पवना डॅमवरील छोट्याश्या बेटावर सुशांत त्याच्या मित्रांबरोबर पार्टी करायचा.

एनसीबीने पवना डॅमवरील बेटावर जाऊन चौकशी केली. तेथील रेस्टॉरंटवाल्यांचे चौकशी केली. स्टेटमेंट नोंदवले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार स्टेटमेंटच्या आधारे सुशांतबरोबर रिया चक्रवर्ती अनेकवेळा या ठिकाणी आली आहे. केवळ रियाच नाही तर अभिनेत्री सारा अली खान देखील ४- ५ वेळा याठिकाणी आली होती. तर श्रध्दा कपूरलाही या ठिकाणी सुशांतबरोबर बघण्यात आलं होतं.

त्याचबरोबर सुशांत सिंग राजपूतबरोबर दीपेश सावंत, सॅम्यूयल मिरांडा, शैविक या बेटावर यायचे. बेटावर नेहमी जंगी पार्टी होत असे. या पार्टीत दारू, गांजा आणखी नशा आणणाऱ्या पदार्थ्यांचे सेवन केलं जायचं. या आधी रियाने देखील सारा अली खान, रकुल,सिमॉन यांची नावं घेतली आहेत. ज्यांची चौकशी सध्या सुरू आहे.

याचबरोबर सुशांत सिंग राजपूतचे फार्म हाऊस, पवना येथील बेटावर पार्टील आलेल्या लोकांवर एनसीबीची नजर आहे. सध्या रियाला भायखळा कारागृहात ठेवण्यात आले आहे. कोर्टाने दोनवेळा रियाचा जामीन नाकारला आहे.


हे ही वाचा – पृथ्वीबरोबर आणखी एका ग्रहावर आहे जीवसृष्टी, शास्त्रज्ञांच्या अभ्यासात आलं समोर!