सुष्मिता सेन २६ वर्षांपुर्वी ठरली मिस युनिव्हर्स; प्रियकराने दिल्या ‘खास’ शुभेच्छा!

रोहमन शॉलने २६ वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्याबद्दल तिला खास शुभेच्छा दिल्याने सध्या सोशल मिडीयावर त्याचीच चर्चा सुरू आहे.

Mumbai
सुष्मिता सेन २६ वर्षांपुर्वी ठरली मिस युनिव्हर्स; प्रियकराने दिल्या 'खास' शुभेच्छा!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेनसाठी २१ मे हा दिवस खूप स्पेशल आहे. या दिवशी तिने जगभरातील भारताचे नाव रोशन करून मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकले. तिने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. हा किताब जिंकून सुष्मिता सेनला आज २६ वर्ष पुर्ण झाले आहे. मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

आज २६ वर्षापूर्वी ती मिस युनिव्हर्स झाली होती, या निमित्ताने सुष्मिता सेनचे चाहते तिला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत, मात्र या सगळ्यात ज्याने दिलेल्या शुभेच्छा अधिक स्पेशल ठरल्यात तो म्हणजे सुष्मिताचा प्रियकर रोहमन शॉल. रोहमन शॉलने २६ वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्याबद्दल तिला खास शुभेच्छा दिल्याने सध्या सोशल मिडीयावर त्याचीच चर्चा सुरू आहे.

रोहमन शॉलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुष्मिता सेनचा थोब्रेक फोटो शेअर केला आहे, अभिनेत्री सुष्मिताचा हा फोटो जेव्हा ती मिस युनिव्हर्स ठरली तेव्हाचा आहे. या फोटोत सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा क्रॉऊन परिधान केलेला दिसतोय. हा फोटो शेअर करताना रोहमनने तिला ‘जान’ म्हणत या खास दिवसाबद्दल अभिनंदनही केले. सुष्मिता सेनसाठी त्याने आपल्या पोस्टमध्येही असेही लिहिले की, How proud you made all of Us & still continue to do so !!.

रोहमन शॉलने सुष्मिता सेनसाठी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे बरेच चाहते या पोस्टला खूप लाईक आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसताय.


Video: ‘या’ अभिनेत्रीने इंस्टावर शेअर केली ‘लव्हस्टोरी’; चाहते झाले फिदा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here