घरमनोरंजनVideo: 'या' अभिनेत्रीने इंस्टावर शेअर केली 'लव्हस्टोरी'; चाहते झाले फिदा!

Video: ‘या’ अभिनेत्रीने इंस्टावर शेअर केली ‘लव्हस्टोरी’; चाहते झाले फिदा!

Subscribe

या व्हिडीओला शेअर करताना "मेरी लव्ह स्टोरी" असे कॅप्शन दिले आहे

लॉकडाऊन दरम्यान, सर्व कलाकार मंडळी घरी असून आपल्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसताय. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनही याला अपवाद नाही. लॉकडाऊन दरम्यान ही अभिनेत्री आपल्या मुलींसह आणि प्रियकर रोहमन शौलसोबत एन्जॉय करत आहे. अलीकडेच सुष्मिता सेनने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिच्या मुली एलिझा आणि ऋने पियानोवर गाण्याचा सराव करताना दिसताय.

View this post on Instagram

My #lovestory ?❤️I love you guys!!! #duggadugga ?

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

- Advertisement -

व्हिडीओमध्ये, एलिझा तिची मोठी बहीण ऋने हिला मार्गदर्शन करताना दिसतेय, या व्हिडीओला शेअर करताना सुष्मिता सेनने “मेरी लव्ह स्टोरी” असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी ३ लाखाहून अधिक लाईक्स आणि शेअर्स या व्हिडीओला दिले आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी सुष्मिताच्या कुटुंबाचे कौतुक ही केले आहे.

एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “तुमच्या दोन्ही मुली खूप गोड आहेत.” दुसर्‍या चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले- तुम्ही एक प्रेरणा आहात. एका चाहत्याने उत्सुकता व्यक्त करत लिहिले- सुष्मिता, तू आपल्या मुलींच्या वाईट गोष्टीबद्दल कधी त्यांना ओरडली आहेस का? तू त्यांचे खोडकर वागणे कसे सांभाळते.

- Advertisement -

वयाच्या २४ व्या वर्षी झाली ‘आई’

सुष्मिता सेन एक सिंगल पेरेंट आहे आणि ती बर्‍याच काळापासून रोहमन शौल याला डेट करत असून जर दोघांचे लग्न झाले तर हे कुटुंब पूर्ण होईल. जेव्हा सुष्मिता २४ वर्षांची होती तेव्हा तिने ऋनेला दत्तक घेतले. एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली होती की, नैसर्गिक जन्मात आई आणि मूल एका नाभीसंबधीचा दोरखंडाने जोडले जातात जे नंतर कापले जाते. तर अ‍ॅडॉप्शनमध्ये, ते अलौकिक दाराशी जोडलेले आहेत, जे कापले जाऊ शकत नाही.


घरातील ‘या’ व्यक्तीमुळे जान्हवी कपूर, वडील आणि बहिणीसह क्वारंटाईन!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -