सुष्मिताही करणार वयाने लहान असलेल्या मुलाशी लग्न?

सुष्मिता सेन प्रियकर रोहमन शॉलसोबत विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोर धरू लागली आहे.

Mumbai
Sushmita Sen to marry boyfriend Rohman Shawl
सुष्मिता सेन आपल्या प्रियकर रोहमन शाल आणि मुली रेने आणि अलीसाह सोेबत.

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा माहौल सुरू आहे. दीपिका-रणवीर सिंग येत्या १४ तारखेला विवाहबंधनात अडकणार आहेत. तर डिसेंबरमध्ये प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा ही विवाह पार पडणार आहे. प्रियांका वयाने लहान असलेल्या निकशी लग्न करीत आहे, तर मलायका अरोराही सध्या तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. बी टाऊनमध्ये या चर्चा संपत नाहीत तोच सुष्मिता सेनही विवाहबंधनात अडकणार अशी वावटळ सध्या उठली आहे. प्रियांका आणि मलायकाप्रमाणे सुष्मिताही वयाने लहान असलेल्या बॉयफ्रेंडला डेट करत आहे.

 

View this post on Instagram

 

#duggadugga ❤️

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on


सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शाल काही दिवस झाले आपल्याला एकत्र बाहेर दिसत आहेत. मात्र आता चर्चा अशी सुरू आहे की, हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रेमाने भरलेल्या Instagram पोस्ट्स आणि एकत्र फोटोमुळे सर्वांना असेच वाटतेय की माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

सुष्मिता ४२ वर्षांची असून, वयाच्या अठराव्या वर्षी तिनं ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. वयाच्या २५ व्या वर्षी तिनं पहिल्यांदा मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर पुन्हा तिने एका मुलीले दत्तक घेतलं. सध्या ती एकटी दोन्ही मुलींचं संगोपन करत आहे. सुष्मिता अजूनही अविवाहित आहे. सुष्मिता सेनने या अगोदर बऱ्याच लोकांना डेट केल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये चघळली गेलीये. त्यात काही सेलिब्रिटी, क्रीडापटूंचाही समावेश आहे. जसे की रणदीप हुड्डा, विक्रम भट्ट, अनिल अंबानी, वसिम अक्रम, सबीर भाटिया.

नुकत्याच टाकलेल्या Instagram पोस्टमध्ये रोहमन तिच्या दोन्ही मुली रेने आणि अलीसाह सोबत सुष्मिताच्या घरी दिवाळी साजरी करताना दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार २०१९ च्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार आहेत. ते दोघे एका फॅशन इव्हेंटदरम्यान भेटले आणि तिथून पुढे त्यांचे नाते खुलले. सुष्मिता आणि रोहमन दोन महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. रोहमनने तिला लग्नासाठी सुध्दा प्रपोज केलंय. सुष्मितानेही आनंदाने ते प्रपोजल स्वीकारल्याची माहिती,  सुत्रांकडून मिळत आहे. शिवाय रेने आणि अलीसाह दोघांनाही रोहमन फारच आवडलेला दिसतोय.

शिल्पा शेट्टीने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये दोघे एकत्र दिसले होते. शिवाय Instagram च्या माध्यमातून त्यांच्यातले खुललेले प्रेम सर्वांसमोर उघड आहेच. त्यामुळे बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री (अखेर) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here