घरमनोरंजनसुयश टिळक दिसणार 'या' वेबसिरीजमध्ये

सुयश टिळक दिसणार ‘या’ वेबसिरीजमध्ये

Subscribe

सुयश झी युवावरील एक घर मंतरलेलं या मालिकेत काम करत आहे. क्षितीज निंबाळकर ही व्यक्तीरेखा तो साकारत आहे. लवकरच तो एक वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.

सध्या वेबसिरीजकडे मराठी कलाकार मोठ्या संख्येने वळले आहेत. रोज नव नवीन नावं पुढे येत आहेत. वेबसीरिजने प्रत्येकालाच भुरळ घातली आहे. या यादीत आता आणखी एक मराठी कलाकाराचे नाव आले आहे. तो कलाकार म्हणजे अभिनेता सुयश टिळक. सुशय सध्या एका वेबसीरिजचे शूटिंग करत आहे. यात तो कोणती भूमिका साकारतोय वेबसीरिजचे नाव काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सध्या सुयश झी युवावरील एक घर मंतरलेलं या मालिकेत काम करत आहे. क्षितीज निंबाळकर ही व्यक्तीरेखा तो साकारत आहे. क्षितिज हा एक नामवंत व्यवसायिक असून त्याला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. का रे दुरावा या मालिकेनंतर घराघरात पोहोचला. का रे दुरावा या मालिकेतील सुयश टिळकने साकारलेली भुमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.

- Advertisement -

एक घर मंतरलेल

सध्या सुयश साकारत असलेल्या एक घर मंतरलेल्या या मालिकेतील क्षितीज या पात्रालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुयश आणि सुरूची पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसत आहेत. या आधी कारे दुरावा आणि स्ट्रॉबेरी या नाटकात या दोघांनी एकत्र काम केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -