सुयश टिळकच्या बुमरँग वेबसिरिला प्रेक्षकांची पसंती

या वेबसिरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या नुकताच भेटीस आला असून हा भाग साडे नऊ हजाराहून अधिक लोकांना आतापर्यंत पाहिला

Mumbai

छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सुयश टिळक आता बेवसिरीजच्या माध्यमातून चांगलाच चर्चेत आला आहे. फिल्मबाझ फिल्मची ही वेबसिरिज प्रेक्षकांना सध्या युट्युबला बघायला मिळत आहे. ही वेबसिरिज हॉरर आणि सस्पेन्स बाजाची वेबसिरिज असून या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नुकताच या वेबसिरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आतापर्यंत हा पहिला भाग नऊ हजाराहून अधिक लोकांना पाहिला आहे. बुमरँगमध्ये वेबसिरिज सुयश सोबतच ओमकार बोरकर, सिद्धेश नागवेकर, शुभम देसाई, मिलिंद जाधव, आनंद शिंदे, सीमा कुलकर्णी, राजेंद्र खेडेकर, पूजा चांदेकर, रक्षदा रणदिवे यांच्या मुख्य भूमिका साकरत आहे.

या वेबसिरीज दिग्दर्शन कुणाल राणेने केले असून लेखन अक्षय टेमकरचे आहे. बुमरँगमध्ये वेबसिरिजच्या पहिल्या भागामुळे प्रेक्षकांची उत्सुकतेत कमालीची वाढ झाली असून दुसरा भाग कधी येणार याची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत आहे.

सुशय टिळक हे नाव का रे दुरावा या मालिकेनंतर घराघरात पोहोचले. का रे दुरावा या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. सध्या सुयश एक घर मंतरलेलं मालिकेमध्ये क्षितिज निंबाळकर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुयश आणि सुरुची पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.