घरमनोरंजन'आयला आयला सचिन' म्हणत स्वप्नील जोशीचा धमाका

‘आयला आयला सचिन’ म्हणत स्वप्नील जोशीचा धमाका

Subscribe

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

बहुचर्चित ‘मी पण सचिन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे नुकतेच प्रमोशनल साँग चित्रित करण्यात आले. ‘आयला आयला सचिन’ असे हे गाणं असून सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणे एक पर्वणीच ठरणार आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत आहे. एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित झाले आहे.

सचिन तेंडुलकर यांना ट्रिब्युट

‘आयला आयला सचिन’ हे गाणं त्रिनीती ब्रदर्स म्हणजेच हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केले असून आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. आम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना या गाण्याद्वारे ट्रिब्युट देणार आहोत. त्यामुळे हे गाणं करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती म्हणून हे गाणं करताना खूप मजा आली असल्याचे या चित्रपटाचे निर्माता श्रेयस जाधव यांनी सांगितले. हा चित्रपट एका माणाच्या आयुष्यावर अवलंबून आहे.

- Advertisement -

१ फेब्रुवारीला होणार रिलीज

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित ‘मी पण सचिन’ चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, संजय छाब्रिया, निखिल फुटले आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. श्रेयश जाधव यांनी या आधीही आपल्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत. त्यामुळे या चित्रपटातूनही प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल, यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -