घरCORONA UPDATEरामायणाच्या 'या' पात्राची स्वरा भास्करशी तुलना, सोशल मीडियावर ट्रोल!

रामायणाच्या ‘या’ पात्राची स्वरा भास्करशी तुलना, सोशल मीडियावर ट्रोल!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र यावर उपाय म्हणून ९०च्या दशकात गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यात रामायण, महाभारत, शक्तीमान, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू झाले. मात्र रामायण मालिका सुरू झाल्याचा मनस्ताप स्वरा भास्करला सहन करावा लागला आहे. वेळी कोणत्या कोणत्या वक्तव्यामुळे नाही तर रामायण मालिकेमुळे स्वरा भास्कर ट्रोल झाली आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल होणं हे काही आता नवीन नाहीये. खरं तर सध्या स्वराला ट्रोस करण्यासाठी तिनं कोणंतही ट्विट किंवा वक्तव्य केलं नाहीए. तरी देखील नेटकऱ्यांनी तिची तुलना रामायणातील मंथरेसोबत केली आहे. स्वरा ही कलियुगातील मंथरा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. रामायण मालिकेचे प्रक्षेपण झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडल्याचंही पाहायला मिळालं. रामायणातील कैकयी आणि तिची दासी मंथरा ही दोन्ही पात्रं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.

- Advertisement -

स्वराने अद्याप यावर काही प्रतिक्रीया दिलेली नाहीये. राजकीय आणि परखड मत व्यक्त करण्यासाठी स्वरा प्रसिद्ध आहे. या ट्रोलिंगवर स्वरा काय उत्तर देतेय याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -