घरमनोरंजनकंगनाच्या 'मणिकर्णिका'ला आणखीन एक झटका!

कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ला आणखीन एक झटका!

Subscribe

कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. अभिनेता सोनू सूदनंतर आता अभिनेत्री स्वाती सेमवालनेही हा चित्रपट सोडला आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत सध्या ‘मणिकर्णिका:द क्वीन ऑफ झांसी’ या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाचं शुटींग सुरू झाल्यापासूनच चित्रीकरणे अनेक अडथळे येत आहेत. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने या चित्रपटाला राम राम केला होता. तर आता आणखी एका अभिनेत्रीने हा चित्रपट सोडल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री स्वाती सेमवालनेही ‘मणिकर्णिका:द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सोडल्याचं समजतंय. या चित्रपटात स्वाती सदाशिवराव भाऊंची पत्नी पार्वतीची भूमिका साकारत होती. गेल्या काही दिवसांपासून स्वाती हा चित्रपट सोडणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र अधिकृत माहिती समोर आली नव्हती. अखेर स्वातीने आपण चित्रपट सोडल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

#notsoelegant #manikarnika #movies #actor #writersofinstagram #director #love #film #jhansi #queen

A post shared by Swati Semwal (@semwalswati) on

सोनू सुदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला फार वाव मिळणार नव्हता. त्या भूमिकेला महत्व राहिलं नव्हतं. त्यामुळे मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या टीमशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.

स्वाती  सेमवाल, अभिनेत्री

- Advertisement -

‘मणिकर्णिका:द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर त्याची भूमिका जीशान अयूब साकारणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -