लग्नासाठी तापसीला वरुण धवन नको; हवाय ‘हा’ अभिनेता

बीएफएफ विद वोग च्या सीजन ३ मध्ये तापसी पन्नूसोबत विक्की कौशलसोबत दिसली होती

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्की कौशल या दोघांनी मनमर्जियां या चित्रपटातून एकत्र काम केले आहे. हे दोघेही चांगले मित्र असून त्याचा अभिनयही तितकाच तगडा आहे. नुकतेच तापसीने विक्कीबद्दल बोलताना त्याला मॅरेज मटेरिअल असल्याचे सांगितले. यापुर्वी बाहूबली अभिनेत्री तमन्ना भाटियाने विक्कीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

View this post on Instagram

 

Neela Kukkad tey Laal Pari.. #Manmarziyaan #14thSept Styling & pc: @amandeepkaur87

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

बीएफएफ विद वोग च्या सीजन ३ मध्ये तापसी पन्नूसोबत विक्की कौशलसोबत दिसली होती. यावेळी तापसीने सगळे वाईट आहेत परंतु विक्की कौशल हा चांगला अॅक्टर असल्याचे ती बोलली होती. तसेच, मनमर्जियां या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान व्हॉट्स अॅपवर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. यावेळी विक्कीने तापसी काहीच मनात ठेवणारी नसून खूप मनमोकळी आहे. ती खूपच बोलकी आहे आणि मला दुसऱ्याचे ऐकायला आवडते त्यामुळे आम्ही दोघे खूप चांगले मित्र झालो. यावेळी तापसीने सांगितले तिला विक्की हॉट वाटत नसून मॅरेज मटेरिअल आहे.

 

View this post on Instagram

 

Yeh woh wala hai, Jisme jitna karo kum padhta hai. Rumi’s #Pyaar and #Fyaar 2 weeks to go…. 😁 #Manmarziyaan

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

यावेळी तापसीला अभिनेता वरुण धवन, विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांचे नाव घेऊन अनेक प्रश्न विचारले. तिला असे ही विचारले की ती कोणाशी लग्न करायला आवडेल आणि कोणाला मारायला आवडेल? यावर अभिषेकला मारेल आणि विक्की सोबत लग्न करायला आवडेल कारण तो मॅरेज मटेरिअल आहे, असे तापसीने उत्तर दिले.