‘भाव वाढण्यासाठी मला प्रशिक्षण द्या’; चाहत्याच्या टीकेला तापसीचे प्रत्युत्तर

तापसी पन्नूला ट्विटरवर एका चाहत्याने स्वस्त अभिनेत्री म्हटल्यानंतर तापसीने भन्नाट प्रत्युत्तर दिले आहे.

Mumbai
taapsee pannu
अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तापसीने ट्विटरवर ट्रोलरला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. तिच्या या प्रत्युत्तरानंतर अनेक चाहत्यांनी तापसीला पाठिंबा दिला आहे. या ट्रोलरने तापसीला ‘तू स्वस्त अभिनेत्री आहेस. तुझी मानसिकता चांगली नाही’, असे म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देताना तापसीने भन्नाट ट्विट केले आहे. तापसीने केलेल्या ट्विटला चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तापसी एक चांगली अभिनेत्री असून तिचा अभिनयही चांगला असल्याचे एका चाहत्याने म्हटले आहे. तर एका चाहत्याने तापसीला या साऱ्या गोष्टींकडे लक्ष्य न देण्याचे आवाहन केले आहे.

नेमके काय म्हणाली तापसी?

तापसी पन्नूने ट्रोल करणाऱ्या चाहत्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘ओके सर. आपण मला कधीपासून थेरपी सेशन देणार आहात? यासोबतच मला आपाला भाव कसा वाढवायचा याबाबतही प्रशिक्षण द्या. कारण भाव तर माझीही वाढला पाहिजे.’ तापसीचे या ट्विटने लोकांची मने जिंकली आहेत. तापसीच्या या ट्विटनंतर लोकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. याअगोदरही बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतची बहिण रंगोली चंदेलने तापसीला सस्वस्त अभिनेत्री म्हणून हिणवलं होतं. मात्र, यावर तापसीने प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता एका चाहत्याने ट्रोल केल्यानंतर कंगनाने या टीकेला हसत उत्तर दिले आहे.


हेही वाचा – प्रोस्थेटिक मेकअपचा अमिताभ बच्चन यांना होतोय त्रास