आव्हानात्मक भूमिकेसाठी तापसी सज्ज; ‘रश्मी रॉकेट’चा शेअर केला फर्स्ट लूक

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी दिसतेय

अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, अॅथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. नुकताच तिने चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आकाश खुराना दिग्दर्शित या चित्रपटात या तापसी अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या दुबईत चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.

तापसी आपल्या चित्रपटांसाठी नेहमीच वेगवेगळी आव्हानं स्वीकारते. या चित्रपटामध्ये एका अ‍ॅथलिटची भूमिका साकारण्यासाठीही तापसीने खूप कष्ट घेतले आहेत. तापसीने रश्मी रॉकेट या चित्रपटाचा फस्ट लूक स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Let’s do this ! 🏃🏻‍♀️ #RashmiRocket

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

असा आहे फर्स्ट लूक

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे, असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये ती एका गुजराती मुलीची भूमिका साकारत असून जिने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर इंटरनॅशनल लेव्हलवर स्वत:चे नाव पोहोचवले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला कंपनी ‘आरएसव्हीपी’ च्या बॅनरखाली केली जात आहे. चित्रपटाचे शूटिंग मागील आठवड्यात सुरू झाले आहे. आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात ‘एक्सट्रैक्शन’ फेम, मिर्झापूर २ मधील प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, तापसी पन्नूच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतेच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.


हॉलिवूडमध्ये अभिनेता हृतिक रोशन करणार पदार्पण!