स्त्रीवादावरून तापसीने केले ‘हे’ ट्वीट

'या चित्रपटामध्ये मेहनत त्यातमधील मुलींनीही केली आहे... कदाचित तुम्हाला लिहायला वेळ मिळाला नसावा.'

Mumbai
taapsee-pannu-
तापसी पन्नू

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसापासून कलाकारांना देण्यात येणारं मानधनआणि मिळणारं श्रेय याबाबत सतत चर्चा होतांना दिसते. या मानधनाच्या मुद्द्यावरूनही अभिनेती आणि अभिनेत्रींमध्ये वाद-विवाद होतांना दिसत आहे. यासंदर्भातील आणखी मुद्दा तापसी पन्नूसह कृती सेनन यांनी उचललून धरला आहे. कोणताही चित्रपट यशस्वी झाल्यास त्या चित्रपटातील काम करणाऱ्या कलाकारांचे समान श्रेय असते. परंतु असं न होता त्याचे श्रेय फक्त अभिनेत्यालाच दिले जाते. असे तापसी पन्नूसह कृती सेननने म्हटले आहे.

 श्रेय फक्त सहकलाकारास

सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. या थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.०४ कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी ८.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘लुका छुपी’या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.०१ कोटींची कमाई केली होती. कृती सेननच्या ‘लुका छुपी’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली सोबतच, तिच्या अभिनयाचे कौतुक देखील करण्यात आलं. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला तापसी पन्नूचा ‘बदला’या चित्रपटाचे कौतुक प्रेक्षकांसोबत समीकक्षक देखील करत आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या समीक्षांमध्ये विशेष करून सोशल मीडियावर या चित्रपटाचे श्रेय फक्त पुरुष सहकलाकार कार्तिक आर्यन आणि अमिताभ बच्चन यांना दिले जात आहे.

तापसीने केले असे ट्वीट

या प्रकारास तापसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये तिने असे म्हटले की, ‘या चित्रपटामध्ये मेहनत त्यातमधील मुलींनीही केली आहे… कदाचित तुम्हाला लिहायला वेळ मिळाला नसावा.’ या तापसीच्या ट्विटवर उपरोधिक प्रतिक्रिया देत कृतीने असे लिहिले की, ‘मी तुझ्या भावना समजू शकते.’ चित्रपटाच्या अभिनेत्रीला त्यातील अभिनेत्यांइतकेच मानधन मिळावे आणि श्रेय मिळावे.. या चर्चेने पुन्हा जोर धरल्याचे दिसते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here