घरमनोरंजन'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला मिळाली नवी दयाबेन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला मिळाली नवी दयाबेन

Subscribe

चिड़िया घर या टीवी मालिकेची अभिनेत्री अमी त्रिवेदीला दयाबेनच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील दयाबेन मालिका सोडून गेली तेव्हा पासून या मालिकेच्या चर्चा होतांना दिसत आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी गरोदर असल्याने सुट्टीवर होती. त्यानंतर तिने मालिकेत पुन्हा प्रवेश केलाच नाही. दिग्दर्शक, निर्मात्यांनी दिशा वकानीची बरीच वाट ही पाहिली. परंतु आता या मालिकेला नवी दयाबेन भेटली आहे. या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींविषयी चर्चा होत आहेत.चिड़िया घर या टीवी मालिकेची अभिनेत्री अमी त्रिवेदीला दयाबेनच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली.

- Advertisement -

तशीच दयाबेन साकरणं कठीण

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अमीने सांगितले, ”माझा मित्र परिवार आणि नातेवाईक मला सांगायचे की, मी दयाबेनच्या भूमिकेसाठी योग्य ठरू शकते. परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी मला संपर्क केला नाही. ”यापुढे अमीने असेही सांगितले की, ” जर या मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले तर मी नक्की दयाबेन साकारेन. दिशाने या मालिकेच्या माध्यमातून संपुर्ण देशभर आपली ओळख बनवली आहे. कोणतीही व्यक्ती दयाबेनची भूमिका करेल त्याला दिशा सारखे करणे अवघडच असेल, कारण दिशाने दयाबेनची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

शोध नव्या दयाबेनचा..

बॉम्बे टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेत दिशा आता परतणार नाही. प्रोड्युसर असित मोदी यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, ‘आता नवीन दयाबेनचा शोध घ्यावा लागणार आहे. कारण कोणताही कलाकार मालिकेपेक्षा मोठा असू शकत नाही. दयाबेन शिवाय तिचे मालिकेतील कुटुंब हे पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आता एका नव्या चेहऱ्यासोबत या मालिकेची कथा पुढे जाणार आहे.’

- Advertisement -

दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू

या सोबतच, त्यांनी असे ही सांगितले की, ‘या देशात कामावर जाणाऱ्या अनेक महिला गरोदरपणात मॅटर्निटी ब्रेक घेतात आणि पुन्हा कामावर परततात. आम्ही देखील दिशाला काही महिन्यांचा ब्रेक दिला. पण आता आम्ही तिची अधिक वाट पाहू शकत नाही. कोणत्याही कलाकाराला बदलणं हा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही. त्यासाठी एक महिना आधी पासूनच कथेवर काम करावे लागते. आम्ही दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशनला सुरुवात देखील केली आहे.’

गेल्या काही दिवसात मालिकेची कथालेखक शैलेश लोढा यांनी सांगितल्यानुसार दयाबेन म्हणजेच दिशा मालिकेत परतेल असे कंन्फर्म झाले होते. दिशा वकानीच्या परतण्यावर शैलेश लोढ़ाने सांगितले होते की, ”धैर्य का फल दया होता है.” परंतु आता असित मोदीने दिशा पुन्हा मालिकेत परतणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले. ही बातमी ऐकताच दयाबेनच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -