पाहा – करीनाच्या लाडक्या तैमूरने असा साजरा केला गणेशोत्सव!

यंदा बॉलीवूडची बेबो करीना कपूरची आई बबिता कपूर यांच्या घरी गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी करीनाच्या लाडक्या तैमूरने "मंगल मूर्ती मोरया" म्हणत सर्वांचे लक्ष वेधले.

Mumbai
Taimur shouts Morya for Ganpati Bappa in Mumbai 1

सर्वसामान्यांपासून सिलेब्रिटींपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सव सणाचे खास आकर्षण असते. भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत राज्यभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूडकरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मग यामध्ये बॉलीवूडचे कपूर कुटुंबिय कसे मागे राहिल? यंदा बॉलीवूडची बेबो करीना कपूरची आई बबिता कपूर यांच्या घरी गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी करीनाच्या लाडक्या तैमुरने “मंगल मूर्ती मोरया” म्हणत सर्वांचे लक्ष वेधले.

सवंगड्यांसोबत गणेशोत्सव

तैमूरची मावशी अभिनेत्री करिश्मा कपूरने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तैमूर आपल्या सवंगड्यांसह “मंगल मूर्ती मोरया”चा जयघोष करत गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे. तैमूरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यंदाच्या गणपतीत बबिता कपूर यांच्या घरी तैमूरसह त्याचे काही मित्रमंडळीसुद्धा सहभागी झाले होते. यामध्ये निर्माता करण जोहरची मुलं यश आणि रुही जोहर, हिरू जोहर हे बबिता यांच्या घरी पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा – पाहा – ऐश्वर्या राय- बच्चनच्या डोहाळे जेवणाचे फोटो

पारंपरिक वेशातील तैमूरने जिंकले नेटकऱ्यांची मने

करिश्मा कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तैमूरने पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा घातला असून तैमूरच्या या पारंपरिक पेहरावाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. एका फोटोमध्ये तैमूर त्याचे मित्र रुही जोहर आणि किआन राज कपूर यांच्यासोबत गुडघ्यावर बसून गणपतीसमोर हात जोडून आशिर्वाद घेत आहे.