घरमनोरंजनतैमूर करणार 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण?

तैमूर करणार ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण?

Subscribe

गेल्या काही दिवसात तैमूरच्या नावाची खेळणी तसेच, त्याच्या नावाच्या कुकीज बाजारात आल्या आहेत आणि आता कमी वयातच तैमूर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास तयार आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांना मुलगा तैमूर अली खान हा सगळ्याच सेलिब्रिटींच्या मुलांमध्ये ‘स्टार किड्स’ म्हणून सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. तैमूरचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर येताच सर्वात जास्त व्हारयल केले जातात. गेल्या काही दिवसात तैमूरच्या नावाची खेळणी तसेच, त्याच्या नावाच्या कुकीज बाजारात आल्या आहेत आणि आता कमी वयातच तैमूर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास तयार आहे. तैमूरच्या चित्रपटात काम करण्याबद्दल करिना-सैफला नेहमी विचारले जायचे. परंतु, तैमूर आपली आई करिना कपूर खानच्या सोबत ‘गुडन्यूज’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

- Advertisement -

‘गुडन्यूज’मध्ये तैमूरचा १० मिनिटांचा कॅमिओ अॅपियरेन्स असेल अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे. त्याने दोन सीनची शूटिंग देखील पुर्ण केले आहे. त्या सीनमध्ये तैमूरसोबत अक्षय कुमार आणि करिना कपूर खान देखील दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसणारा व्हिडिओ चित्रपटातील सीनमधील टीम शॉट आहे. यापुर्वी ही तैमूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तैमूरचे खूप कौतुक केले होते. त्या व्हिडिओमध्ये लहानगा तैमूर अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत खेळताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#kiaraadvani #actress

A post shared by CelebrityLife.Insta (@celebritylife.insta) on

- Advertisement -

याशिवाय, ‘गुडन्यूज’मध्ये तैमूरच्या काम करण्याबद्दल कोणतीच अधिकृतरित्या बातमी समोर आलेली नाही. परंतु, तैमूर खरंच या चित्रपटाचा एक भाग असेल तर तैमूरच्या चाहत्यांकरिता हा ‘गुडन्यूज’ असेल असे म्हणता येईल, आणि तेच त्याचे बॉलिवूड क्षेत्रातील पदार्पण असणार आहे. तैमूरची त्याच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्यामुळे, त्याची या क्षेत्रातील एन्ट्री बघणं हे त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -