‘केतकीला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार’

केतकीने तीला अश्लील भाषेत ज्याप्रमाणे ट्रोल केले याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Mumbai

गेले काही दिवस अभिनेत्री केतकी चितळेला सोशलमिडीयावर ट्रोल केले जात आहे. केवळ हिंदी भाषेत बोलण्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.

यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी केतकीने तिला अश्लील भाषेत ज्याप्रमाणे ट्रोल केले याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्याांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

काय आहे मागणी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिलेल्या निवेदनात आयटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाने या प्रकरणात कठोर पाऊले उचलावीत अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.