Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सैफ अली खानचा सोशल मीडियावर 'तांडव'

सैफ अली खानचा सोशल मीडियावर ‘तांडव’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या ‘तांडव’ वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चाहते वेबसीरिजच्या ट्रेलरच्या प्रतीक्षेत होते. पण आता या प्रतीक्षेला पूर्ण विराम लागला आहे. आज ‘तांडव’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर ड्रामा, थ्रिलर आणि सस्पेंसने भरलेला आहे. सोशल मीडियावर सैफ अली खानच्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

‘तांडव’ वेबसीरिजचा ट्रेलर २ मिनिट ५९ सेकंदाचा आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीसाठीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. सत्तेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे पंतप्रधानपदावर लक्ष आहे आणि ते मिळवण्यासाठी ते कोणत्या हद्द पार करतात हे वेबसीरिज आल्यानंतर समजले. वेबसीरिजमध्ये सैफ अली खानने समर प्रताप सिंहची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच अभिनेत्री डिंपल कपाडिया एका दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. Amazon प्राईमच्या या वेबसीरिजमध्ये सैफ अली खान आणि डिंपल व्यतिरिक्त सुनील ग्रोवर, अयूब खान, तिग्मांशू धूलिया, कुमुद मिश्रा, सारा जेन डियास, डिनो मौर्या, गौहर खान, अनूप सोनी, कृतिका कामरा, हितेश तेजवानी, अमायरा दस्तूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. १५ जानेवारीला ‘तांडव’ Amazon प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

सध्या ‘तांडव’मधील सैफ अली खानच्या व्यक्तिरेखेची चांगलीच चर्चा रंगली आहे. या आधी ओटीटीवरी लोकप्रिय वेबसीरिज सेक्रेट ग्रेम्समधील सैफच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामुळे चाहते त्याच्या ‘तांडव’ वेबसीरिजसाठी खूप उत्सुक आहेत. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)


- Advertisement -

हेही वाचा – नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर लावली आग


 

- Advertisement -