‘तान्हाजी’ च्या ‘शंकरा रे शंकरा’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज

तान्हाजी या चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या टीझरला अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केले शेअर

Mumbai

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट तान्हाजी: द अनसंग वॉरियर या हिंदी चित्रपटातील पहिले ‘शंकरा रे शंकरा’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये अजय देवगण वेगळ्याच अंदाजात बघायला मिळत आहे. तान्हाजी या चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या टीझरला अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

‘शंकरा रे शंकरा’ या गाण्याचा टीझर रिलीज होताच युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. अजय देवगण आणि काजोलच्या या चित्रपटाकरता चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. अजय देवगणच्या या पोस्टवर अनेक जण प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता त्याला देखील अनेकांनी पसंती दिली होती.

या चित्रपटात अजय देवगणसह काजोल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती सूभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय-काजोल या दोघांशिवाय सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, शरद केळकर यांच्या देखील मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – Tanhaji Poster: तान्हाजी चित्रपटातील काजोलचा दमदार लूक रिव्हील