घरमनोरंजनअखेर महाराष्ट्रात 'तान्हाजी' टॅक्स फ्री!

अखेर महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री!

Subscribe

तान्हाजीच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेले अनेक दिवस तान्हाजी टॅक्स फ्री करावा ही मागणी जोर धरत होती. अखेर ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

तान्हाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. सदर लढाईवरील “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिटदरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षाकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजिरोत भरण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून ३० एप्रिल २०२० पर्यंतच्या कालावधीतील तिकिट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

तान्हाजी टॅक्स फ्री करावा यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. “तान्हाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.” असं या पत्रात नमुद करण्यात आलं. या आधीच उत्तर प्रदेश आणि हरीयाणा राज्यांनी तान्हाजी करमुक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस पूर्ण झाले असून अजूनही चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत नाही आहे. फक्त १० दिवसांमध्ये १६७.४५ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. आतापर्यंत १५० कोटींच्या वर कमाई या चित्रपटाने केली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर, अजिंक्य देव आणि अभिनेत्री काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -