घरट्रेंडिंग२९ वर्षीय गायिकेने मोडला मायकल जॅक्सनचाही रेकॉर्ड

२९ वर्षीय गायिकेने मोडला मायकल जॅक्सनचाही रेकॉर्ड

Subscribe

‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन हे संगीतक्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. त्याचा अचानक झालेल्या मृत्यूने अनेकांच्या मनाला चटका लागला होता. मायकलने आपल्या ५० वर्षांच्या हयातीत २४ पुरस्कार कमवले. लोक आजही मायकलचे चाहते आहेत. दरम्यान, पॉप संगीत क्षेत्रातील या बाप माणसाचा रेकॉर्ड अमेरिकेच्या एका महिला पॉप सिंगरने मोडला आहे. २०१९ च्या अमेरिकन म्यूजिक अवॉर्डमध्ये अमेरिकेची पॉप सिंगर टेलर स्विफ्टला तिच्या सहा वेगवेगळ्या गाण्यांसाठी पुरस्कार मिळाला आहे. याअगोदर तिला एकूण २३ अवार्ड जिंकले होते. त्यानंतर आता तिच्या नावावर एकूण २९ अवॉर्डची नोंद झाली आहे. त्यामुळे जगभरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

- Advertisement -

पुरस्कार स्विकारताना काय म्हणाली टेलर स्विफ्ट?

अमेरिकन म्युजिक अवॉर्डने याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे. विशेष म्हणजे टेलर फक्त २९ वर्षांची आहे. पुरस्कार स्विकारताना टेलरने सर्वांचे आभार मानले. ‘गेल्या वर्षभरात माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडल्या. मला बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. काही गोष्टी लोकांसमोर आल्या तर काही नाही आल्या. मात्र, या सर्व घडामोडींचा सामना करत मी घडले. त्यामुळे या घडामोडीत माझ्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद’, असे ती म्हणाली.

यापुढे टेलर म्हणाली, ‘इंडस्ट्री खरच खूप विचित्र आहे. आपल्या कलाकृतीबद्दल कधीतरी मनात शंका निर्माण होते की, लोकांना हे आवडेल की नाही? मात्र, लोकांना त्या आवडल्या. हे वर्ष माझ्यासाठी खरच खूप चांगले राहिले. लोकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यामुळे सर्व रसिक-प्रक्षकांचे मी आभारी आहे.’ याशिवाय माझ्या परिवाराचे आणि काम करताना माझी काळजी घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते’, असे टेलर स्विफ्ट पुरस्कार स्विकारताना म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -