घरमनोरंजनफावल्या वेळेत शिकवणी

फावल्या वेळेत शिकवणी

Subscribe

मालिकेचे शूटींग म्हटले की इथे ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी होतातच असे नाही. दीडशे-दोनशे कलाकार, तंत्रज्ञ यांचे युनिट असते. कॉल टाईम दिलेला असला तरी सर्वच जण वेळेवर पोहोचतील असे नाही. बर्‍याचवेळा कलाकारांना प्रतीक्षा करावी लागते. दुसर्‍याचे चित्रीकरण चालू असताना अन्य कलाकारांना फावल्या वेळात काय करायचे हा प्रश्न पडतो. झी हिंदी टीव्हीवर ‘तुझ से है राबता’ ही मालिका दाखवली जाते. मुख्य भूमिकेत मुस्लीम, मराठी तसेच उर्दू भाषेची समज असलेले अनेक कलाकार एकत्रित काम करतात. या सर्व कलाकारांनी फावल्या वेळात काय तर एकमेकांची भाषा जाणून घेण्याचे ठरवले आणि आता संवाद साधताना त्या भाषेचा प्रयोगही होताना दिसतो. फावल्या वेळेतली ही शिकवणी अनेक कलाकारांना फायदेशीर ठरलेली आहे.

‘तुझ से है राबता’ या मालिकेतील कलाकार त्यांच्या खर्‍या नावापेक्षा भूमिकेच्या नावाने अधिक लोकप्रिय झालेले आहेत. रीम शेख (कल्याणी), पूर्वा गोखले (भानुप्रिया), मल्हार राणे (सेहबान अझीम), सविता प्रभुणे यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. रीम ही अस्खलित हिंदी बोलते तर सेहबानला उर्दू भाषेची जबरदस्त समज आहे. पूर्वा, सविता या दोघींना मराठीची जाण आहे. हिंदी-उर्दू शिकत असताना या मराठी कलावती त्यांना मराठी भाषेतील बारकावे काय आहेत हे समजावून सांगतात. वेळही सत्कारणी लागतो आणि आपल्या शिकवण्याने कोणा कलाकाराची भाषा सुधारत असेल तर तो आनंद काही वेगळाच असतो असे या सर्व कलाकारांना वाटायला लागलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -