घरमनोरंजन'माऊली' मधील रितेशचा फर्स्ट लूक रिलीज

‘माऊली’ मधील रितेशचा फर्स्ट लूक रिलीज

Subscribe

अभिनेता रितेश देशमुख लवकरच त्याचा नवा चित्रपट घेऊन येतोय, अशी सर्वत्र जोरदार चर्चा होती. ‘लय भारी’ या सुपरहिट मराठी सिनेमानंतर आता रितेश कोणता नवा सिनेमा आणणार याची प्रेक्षकांची उत्सुकता होती. अनेक दिवस गुलदस्त्यामध्ये असलेल्या या सिनेमाचं नाव आहे ‘माऊली’. माऊली सिनेमामध्ये रितेश ‘माऊली’ हे पात्रं साकारणार आहे. नुकताच माऊलीमधील रितेशचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. रितेशने ट्वीटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपला हा खास ‘माऊली’ लूक शेअर केला आहे. सोशल मीडियावर माऊलीचा फर्स्ट लूक व्हायरल होत असून लोकांची त्याला चांगलीच पसंती मिळते आहे. लई भारी सिनेमातील ‘माऊली’ हेच पात्र रितेश ‘माऊली’ सिनेमात पुढे नेणार असल्याचं समजत आहे. रितेशचा हा खास माऊली लूक आपल्या फोटोमध्ये टिपलाय, तो फेमस फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी. ब्लॅक-व्हाईट इफेक्ट मधला हा सॉलीड फोटो सध्या सोशल मीडियावर खूप फेमस होतो आहे.

- Advertisement -

असा असेल नवा माऊली

या नव्या सिनेमात रितेश लई भारीमधल्या माऊलीचं पात्र साकारत असला तरी, नवा ‘माऊली’ सिनेमा लई भारीचा सिक्वल किंवा प्रिक्वल नाही. ‘माऊली’ हे नाव आणि पात्र वगळता या दोन्ही सिनेमांचा काहीच थेट संबंध नसल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे नवा माऊली सिनेमा लई भारीची फ्रेन्चाइजी असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात अभिनेत्री सयामी खेर रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिकेत दिसेल. फास्टर फेणे सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार माऊलीचं दिग्दर्शन करणार असून, सिनेमामध्ये अजय-अतुलचं संगीत असेल.

ritesh deshmukh sayami khair
रितेश देशमुखसोबत सयामी खैर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -