‘डोंबिवली रिटर्न’चा थरारक टिझर, तुम्ही पाहिलात?

संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका असणारा 'डोबिंवली रिटर्न' हा चित्रपट एका सायकोथ्रीलरची गोष्ट आहे.

Mumbai
dombivali return teaser

अभिनेता संदीप कुलकर्णीच्या ‘डोंबिवली रिटर्न’ या आगामी मराठी चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ‘जे जातं…तेच परत येतं?’ अशा गूढ टॅगलाईनसह काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. पोस्टरवरील कलाकारांचे भेदरलेले चेहरे पाहिल्यावर ‘डोंबिवली रिटर्न’मधून चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार? याविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. नुकताच या चित्रपटाचा थराराक टिझर रिलीज झाला असून, सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘काय वेलणकर…’ असा प्रश्न आणि त्याभोवती गुंफलेली अनेक पात्रं, असा एकंदर थरार ‘डोंबिवली रिटर्न’च्या टिझरमधून अनुभवायला मिळतो. संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘डोंबिवली रिटर्न’ हा चित्रपट एका सायकोथ्रीलरची गोष्ट आहे. युट्यूब आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘डोंबिवली रिटर्न’च्या टिझरवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मूळ आहे’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे याचं चित्रं उभं करणारी हा चित्रपट आहे. ‘नावामुळे हा ‘डोंबिवली फास्ट’चा सिक्वेल आहे असं वाटेलही पण या पेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. कारण एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच,’ असं चित्रपट लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं आहे. कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here