घरमनोरंजन'तेरी मेरी कहानी' राणू मंडलचं पहिलं गाणं प्रदर्शित!

‘तेरी मेरी कहानी’ राणू मंडलचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Subscribe

प्रिया प्रकाश वॉरियर, डान्सिंग अंकल अशा अनेकांना सोशलमिडीयाने एका रात्रीत स्टार बनवलं आहे. सध्या या मध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. राणूने आपलं पहिलं गाणं गायक, संगीतकार हिमेश रेशमियासोबत गायलं आहे. या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतचं मुंबईत पार पडलं. या रेकॉर्डिंगचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत हिमेश रेणूकडून गाणं गाऊन घेताना दिसत आहे. राणूने ‘तेरी मेरी कहानी’ हे आपलं पहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे. राणूचे हे पहिलं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यावर सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झालं. ‘हॅपी हार्डी एण्ड हीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. राणूचं हे गाणं सध्या सोशलमिडीयावर ट्रेंडींग आहे.

राणू मंडलच्या या गाण्याची खूप चर्चा झाली होती. त्यामुळे हे गाणं कधी एकदा प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. गाण्याच्या टीझरने आणि मेकिंग व्हीडीओने चाहत्यांची मनं जिंकली होती. आता हे गाणं काय धम्मल करणार हे बघावं लागेल. केवळ हे गाणं नाही तर राणू ने हिमेश बरोबर आणखी एक गाणं गायलं आहे. आदत आणि आशिकी मे तेरी ही गाणी गायली आहेत. या गाण्यांमुळे राणूची तुलना थेट लता मंगेशकरांबरोबर केली होती.

- Advertisement -

कोण आहे राणू मंडल
राणू मंडल पश्चिम बंगाल येथं राहते. दररोज ती स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होती. लता दीदींचं अवघड गाणं सहजतेने गाणाऱ्या राणूला पाहून एकानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राणूला आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विचारण्यात आलं आहे. एका कार्यक्रमाच्या टीमनं तर तिचा मेकओव्हरच केला आहे. त्यामुळे तीचा लूक पुर्णपणे बदलला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -