घरमनोरंजन'भूतराजा' बनून नवाजुद्दीनने केले अक्षयचे बेहाल; 'या' गाण्याचे आहे रीक्रिएशन

‘भूतराजा’ बनून नवाजुद्दीनने केले अक्षयचे बेहाल; ‘या’ गाण्याचे आहे रीक्रिएशन

Subscribe

'भूतराजा' बनून नवाजुद्दीनने अक्षयच्या अंगातील भूत काढतांना त्याचे बेहाल केल्याचे या गाण्यात दिसते.

बॉलिवूडचा अभिनेता अक्षयकुमार आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा ‘हाऊसफुल 4 (Housefull 4)’ चित्रपटातील ‘द भूत साँग (The Bhoot Song)’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी ‘भूत राजा’ बनल्याचे गाण्यात बघायला मिळत आहे. नवाजुद्दीनची या चित्रपटातील भूमिका आणि त्यांची स्टाईल त्यांच्या चाहत्यांना वेगळी भासल्याने त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करत आहे.

- Advertisement -

या गाण्यात नवाजुद्दीन सिद्दीकी ‘भूत राजा’ बनून अक्षयच्या अंगातील भूत बाहेर काढताना दिसत आहे.या गाण्यामध्ये नवाजुद्दीन आपला प्रसिद्ध डायलॉग ‘अपुनइच भगवान है’ बोलताना दिसत असून अक्षयकुमार या गाण्यात खूपच घाबरलेला दिसत आहे. ‘भूतराजा’ बनून नवाजुद्दीनने अक्षयच्या अंगातील भूत काढतांना त्याचे बेहाल केल्याचे या गाण्यात दिसते.

हे गाणं रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेंडमध्ये आहे. या गाण्याला मीका सिंगने आपला आवाज दिला आहे.

- Advertisement -

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर आपल्या या चित्रपटाचे ‘द भूत साँग’ चे फर्स्ट लूक शेअर केले आहे. हे गाणं १९७७ मध्ये आलेल्या धर्मेन्द्रचा ‘चाचा भतीजा’ या चित्रपटातील ‘भूत राजा बाहर आजा…’ या गाण्याचे रीक्रिएशन आहे. त्यावेळी या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी तयार केले होते.

या गाण्याचे केले आहे रीक्रिएशन 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -