Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'द फॅमिली मॅन'ची प्रतिक्षा संपली, या दिवशी होणार प्रदर्शित

‘द फॅमिली मॅन’ची प्रतिक्षा संपली, या दिवशी होणार प्रदर्शित

१२ फेब्रवारीला या वेबसिरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता मनोज वाजपेयीची द फॅमिली मॅन हि वेब सिरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यात अभिनेता मनोज वायपेयी प्रमुख भूमिकेत होता. ही वेबसिरिज २०१९मध्ये रिलिज झाली होती. प्रेक्षकांनी वेबसिरिजला पसंती दर्शवली होती. या वेबसिरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पहिल्या सीझनने प्रेक्षकांच्या मनात राज्य केल्यानंतर आता दुसरा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत आहे. १२ फेब्रवारीला या वेबसिरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. वेबसिरिजचा टिइर रिलिज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

- Advertisement -

पहिला सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची मोठी उत्सुकता होती. मात्र त्यांची आतुरता आता संपली आहे. १२ फेब्रुवारीला प्रेक्षकांना सीझन २ पाहता येणार आहे. अभिनेता मनोज वायपेयी याची या वेबसिरिजमध्ये प्रमुख भूमिका पहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रियामणी, गुल पनाग, शारीब हाश्मी, आसिक बसरा यांचा अभिनयही पहायला मिळाला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये एक नवीन एंट्री पहायला मिळणार आहे. सीझन २ मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्कीनेनी या अभिनेत्रीची दमदार एंट्री पहायला मिळणार आहे.

या वेबसिरिजच्या निमित्ताने दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा ही पहिल्यांदा ओटीटीवर पदार्पण करत आहे. तिची ही पहिलीच वेबसिरिज असणार आहे. द फॅमिली मॅन ही वेबसिरिज एक थ्रिलर आणि एक्शन ड्रामा आहे. श्रीकांत तिवारी हा मध्यमवर्गीय माणूस जे राष्ट्रीय अन्वेशन एजन्सीचा (National Investigation Agency) विशेष एजंट आहे. या दरम्यान तो आपलं काम आणि घर कसं सांभाळतो अशी एका मध्यमवर्गीय परिवाराची आणि उच्च वर्गातील राहणाऱ्या एका गुप्तहेराची ही कहाणी आहे. द फॅमिली मॅनच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती दुसरा सीझनही तितकाच दमदार असेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.


- Advertisement -

हेही वाचा – माझ्यावर हसणाऱ्यांवर आता रडण्याची वेळ, कंगना रनौतचे नवे ट्वीट

- Advertisement -