KBC 12: ‘करमवीर स्पेशल’मध्ये लिअँडर पेस आणि दीपा कर्माकर

केबीसीच्या आगामी करमवीर स्पेशल एपिसोडसाठी दोघांनी अस्सल पारंपरिक वेशात, उत्साह, आनंद आणि हास्याची मेजवानी दिली आहे.

प्रेरणादायी टेनिस पटू लिअँडर पेस आणि प्रसिद्ध जिम्नॅस्ट दीपा कर्माकर या दोघांनी चाहत्यांना आनंदाची भेट दिली. विविध प्रसंगी त्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. केबीसीच्या आगामी करमवीर स्पेशल एपिसोडसाठी त्यांनी अस्सल पारंपरिक वेशात, उत्साह, आनंद आणि हास्याची मेजवानी दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांना जुन्या आठवणींमध्ये नेले, त्यांचे यश, आव्हाने आणि गाठलेल्या यशशिखरांच्या स्मृती पुन्हा जागृत केल्या आहेत. हा एपिसोड उद्या, शुक्रवारी रात्री ९ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना बघता येणार आहे.

यावेळी बिग बींनी कर्माकर यांना विचारले की, १९९६ साली पेस यांनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याचे तुम्हाला आठवते का? यावर त्या म्हणाल्या, ‘ सर, मी तेव्हा ३ वर्षाची होते. ” तेव्हा थोडा लाजलेल्या पेसने म्हटले की, ‘ सर तिने आज मला खरोखरच वृद्ध झाल्याची जाणीव करून दिली.” रॅपिड फायर राउंडमध्ये बिग बींनी पेस आणि कर्माकर यांना त्यांचे आवडते खेळाडू, जेवणादरम्यानच्या गमती, आव्हानात्मक प्रतिस्पर्धी इत्यादीबद्दल मोकळेपणाने बोलते केले. कर्माकर यांना त्यांच्या आवडत्या बॉलिवूड व्यक्तीबद्दल विचारले तेव्हा, त्या म्हणाल्या, “ हृतिक रोशन” आणि लगेच पुढे म्हणाल्या, “ तुम्ही तर आहातच” तर पेस म्हणाले, मला नेहमीच अमिताभ बच्चन आवडतात.

या ताऱ्यांनी काही संदेशपर वक्तव्यही केले. “ चॅम्पियन होण्यासाठी आपण जास्तीत जास्त मेहनत घेतली पाहिजे, अन्यथा आपण फक्त खेळाडूच राहू,” असे पेसने खऱ्या स्पोर्ट्समनच्या शैलीत सांगितले. कर्माकर यांनी प्रोडुनोव्हा वॉल्ट या प्रतिस्पर्धीबद्दल सांगितले. ती डेथ वॉल्ट म्हणूनदेखील ओळखली जाते. तिच्यासोबतची झुंज हा माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक क्षण होता, असे कर्माकर म्हणाल्या. मेडल जिंकण्याची संधी कशी मिळेल, याबद्दल प्रशिक्षकाला विचारले असता, त्यांनी कर्माकर यांना सांगितले की, “प्रोडुनोव्हा ही संधी असू शकते, पण ती धोकादायकही ठरू शकते.” यावर कर्माकर म्हणाल्या, “ मला ती धोकादायक वाटत नाही. मला फक्त मेडल जिंकायचे आहे. आपल्या आयुष्यात ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे अनुभव सांगितल्यास, लोकांना पुढील प्रवास अधिक सोपा होतो, असेही त्या म्हणाल्या.


सई-ललित यांची ‘कलरफुल’ लव्हस्टोरी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस