घरमनोरंजन'तुला पाहते रे' या मालिकेतील विक्रांत सरंजामेचे पार पडले शेवटचे शुटिंग!

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत सरंजामेचे पार पडले शेवटचे शुटिंग!

Subscribe

नायक ते खलनायक असा विक्रांत सरंजामेचा प्रवास संपला

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने काही कालावधीत उदंड प्रतिसाद मिळवला आहे. सध्या ही मालिका एका नवीन वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे. जेव्हा ही मालिका सुरु झाली तेव्हा विक्रांतची म्हणजेच सुबोध भावेची प्रेमळ, विश्वासू, आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला एक नायक आणि काही काळानंतर एक खोटारडा, विश्वासघातकी, अशी खलनायकाची भूमिका करणाऱ्या विक्रांत सरंजामे याचा कालचा या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होतो. नायक ते खलनायक असा विक्रांत सरंजामेचा प्रवास आता संपला आहे.

जरी विक्रांत सरंजामेचे शुटिंग संपले असेले तरी ही मालिका अजून सुरु आहे. अभिनेता सुबोध भावेने सकाळी त्याच्या इन्टाग्राम अकाऊंवरुन पहिल्या दिवसांचा ‘तुला पाहते रे’या मालिकेचे निर्माते अतुल केतकर यांच्या सोबतचा फोटो आणि या मालिकेचा मेकअप रुमचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

इन्टाग्रामवर साधला संवाद लाईव्ह  –

तसेच चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी सुबोध भावे याने इन्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला होता. त्याने लाईव्हमध्ये तुला पाहते रे या मालिकेच्या शुटिंगचा कालचा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले. त्याला सगळ्यांची आठवण येत असल्यामुळे त्याने इन्टाग्रामवर स्टोरी शेअर केली असल्याचे देखील सांगितले. तसेच पहिल्या दिवशी म्हणजेच जुलै महिन्यात मालिकेचा प्रोमो शुट केल्याची आठवण सगळ्यांसोबत शेअर केली. सेटवर आलेल्या अनुभवाबद्दल त्याने या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व काही बोलला आहे आणि पुन्हा एकदा मालिकेच्या शेवटच्या दिवशी मी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाच्या भेटायला येईन असे त्याने सांगितले.

- Advertisement -

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा –

या लाईव्ह व्हिडिओला प्रेक्षकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. सुबोध भावेच्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले. तसेच त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सुबोध भावेची झी मराठी वाहिनीवरील ही दुसरी मालिका होती. या आधी तो कुलवधू मालिकेत विक्रमादित्य या भूमिकेतून सर्वांना दिसला होता. आता सध्या सुबोध भावे हा ‘अश्रूंची झाली फुले’ या तीन अंकी नाटकात लाल्याची भूमिका साकारताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -