कपूर घराण्याची ऐतिहासिक हवेली कोसळण्याची शक्यता

या जागेच्या सध्याचे मालक जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांनी ही हवेली जमीनदोस्त करून व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला आहे.

the matter of the collapse historic mansion of the kapoor family
कपूर घराण्याची ऐतिहासिक हवेली कोसळण्याची शक्यता

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबाची पाकिस्तानमधील पेशावर शहारातील ऐतिहासिक वडिलोपार्जित ‘कपूर हवेली’ कोसळण्याच्या धोक्यात आहे. या जागेच्या सध्याचे मालक जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांनी ही हवेली जमीनदोस्त करून व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला आहे. यापूर्वी २०१८मध्ये ऋषी कपूर यांनी पाकिस्तान सरकारला खैबर-पख्तुन्वा प्रांतातील पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार परिसरातील ‘कपूर हवेली’चे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्याची विनंती केली होती.

ऋषी कपूर यांनी विनंती केल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कपूर हवेलीचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करील असे आश्वासन दिले होते. पण प्रांतीय सरकार ऐतिहासिक बाब लक्षात घेत हवेली विकत घेऊन मूळ स्वरुपात जतन करायचे होते. पण सध्याचे मालक जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांना ही इमारत जमीनदोस्त करून इथे व्यापारी संकुल उभारण्याची इच्छा आहे. या हवेलीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

ऋषी कपूर यांचे आजोबा आणि ज्येष्ठे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म या हवेलीत झाला होता. कपूर हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर यांनी फाळणीच्या आधी १९२० च्या दरम्यान बांधली होती. सध्या या हवेलीत आता भुतांचे वास्तव्य असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ही हवेली कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. पहिला ही हवेली पाच मजल्याची होती पण आता तीन मजल्याची झाली आहे.


हेही वाचा – अभिनेत्री दिव्या चोक्सीचे निधन; सोशल मीडियावरून मागितली होती मदत