घरमनोरंजननवाजुद्दीनच्या आयुष्यात 'फिरंगी' सुंदरीची एंट्री?

नवाजुद्दीनच्या आयुष्यात ‘फिरंगी’ सुंदरीची एंट्री?

Subscribe

या फिरंगी तरूणीसोबतचा फोटो शेअर करताना नवाजुद्दीनने, ही मुलगी माझ्या 'रोम-रोम'मध्ये सामावली असल्याचं म्हटलं आहे.

‘सिक्रेड गेम्स’ या लोकप्रिय वेबसिरीजमुळे सध्या चांगलाच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. मात्र, नवाजुद्दीन आता एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरतो आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एका सुंदर तरुणीसोबतचा आपला फोटो शेअर केला अाहे. फोटोमध्ये नवाजुद्दीनसोबत असलेली सुंदरी एक विदेशी तरुणी असून, ‘ही तरुणी माझ्या नसानसांत सामावलेली आहे, अशा अर्थाचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. नवाजुद्दीनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोची आणि त्याहून अधिक या वाक्यामुळे सध्या विविध चर्चांना अक्षरश: उधाण आलं आहे. विशेषत: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांना, त्याच्या आयुष्यात आलेली ही फिरंगी सुंदरी कोण आहे? हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली असणार हे नक्की.

युरोपमध्ये नवाजुद्दीनचा रोमान्स?

उपलब्ध माहितीनुसार नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या युरोपमध्ये शूटिंग करतो आहे. ‘रोम’ हे युरोपमधीलच एक प्रसिद्ध शहर आहे. रोमान्सचं शहर अशी ओळख असलेल्या या सुंदर शहरात आजवर अनेक बॉलीवूड सिनेमांचं शूटिंग झालं आहे. या पार्श्वभूमीवर नवाजुद्दीनने शेअर केलेल्या या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Ye Ladki mere ‘ रोम रोम में ‘ hai

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

दरम्यान सिक्रेड गेम्स वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलेला नवाजुद्दीन, लवकरच काही बॉलीवूड सिनेमांमध्ये झळकणार आहे. यामध्ये प्रामुख्याने संजय राऊन निर्मित ‘ठाकरे’ हा सिनेमा आहे. या सिनेमात नवाजुद्दीन हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसंच तो रितेश बत्रा यांच्या ‘फोटोग्राफ’ या सिनेमात सनाया मल्होत्राबरोबर झळकणार असल्याची चर्चा आहे. मध्यंतरीच नवाजुद्दीन नंदिता दास दिग्दर्शित ‘मंटो’ या चित्रपटाचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग करून भारतात परतला होता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -