‘केदारनाथ’ चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

चारधामांपैकी एक पवित्र असलेल्या 'केदारनाथ' या देवस्थानाच्या नावाने लव्हस्टोरीवर आधारीत चित्रपट कसा तयार केला जातो असा सवाल करत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mumbai
petition filed against kedarnath movie
केदारनाथ चित्रपटाविरोधात याचिका दाखल

बहुचर्चित केदारनाथ चित्रपटच्या अडचणीत वाढ झाली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र त्यापूर्वीच या चित्रपटावर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे. चारधामांपैकी एक पवित्र असलेल्या ‘केदारनाथ’ या देवस्थानाच्या नावाने लव्हस्टोरीवर आधारीत चित्रपट कसा तयार केला जातो असा सवाल करत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी

अॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अॅड. प्रभाकर त्रिपाठी यांच्यावतीने ही याचिका आज मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचं पुन्हा परिक्षण करावे. परिक्षण होत नाही तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान सीबीएससीतर्फे देखील ही याचिका राजकीय हेतून प्रेरित असू शकते तसंच आम्ही या चित्रपटाचे परीक्षण केले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान हायकोर्टाने हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याने गुरुवारीच यावर सुनावणी ठेवली आहे.

हेही वाचा – 

‘केदारनाथ’च्या अडचणी वाढल्या; हाय कोर्टात याचिका दाखल!

‘केदारनाथ’ही अडकला मीम्समध्ये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here