घरमनोरंजनतीच इनिंग पण नव्याने

तीच इनिंग पण नव्याने

Subscribe

आपण पुन्हा दिग्दर्शनात क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध निर्माते,बोनी कपूर यांनी नुकतेच जाहीर केले. पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये एका इंटरव्हयू दरम्यान त्यांनी त्यांची ही इच्छा बोलून दाखवली.

भविष्यात कपूर कुटुंबियांतील तरुण पिढीला घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.
बोनी कपूर यांनी लेखकांना कथा, संकल्पना पाठविण्याचे आवाहनही केले. यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शकांशी लेखकांनी संपर्क साधावा. चांगल्या संकल्पनेवरील कथानकावर चित्रपट काढता येईल, असे आवाहन बोनी कपूर यांनी केले.

- Advertisement -

या वेळी बोनी कपूर यांनी पूर्वीपेक्षा चित्रपट क्षेत्रात काम करण्याच्या अनेक पध्दती बदलल्याचे सांगितले. पूर्वी 50-60 सिनेमाघरात चित्रपट प्रदर्शित होत होते, आज ठग्ज ऑफ हिंदुस्थानसारखा चित्रपट 7000 सिनेमाघरात प्रदर्शित झाला आणि चीनमध्येही प्रदर्शित होतोय, असे सांगून भानू अथैय्या, ए. आर. रेहमान, रस्सूल पकूटी यांची उदाहरणे देत भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या ऑस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे सांगितले.

एकंदरीतच आता कपूर घराण्याच्या संपूर्ण तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी चित्रपट निर्माते बोनी कपूर लवकरच दिग्दर्शनात उतरणार आहेत. त्यांच्या या सिनेमात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -