घरमनोरंजन'स्त्री' चित्रपटाचा दुसरा, तिसरा भाग येणार

‘स्त्री’ चित्रपटाचा दुसरा, तिसरा भाग येणार

Subscribe

मागील वर्षी प्रदर्शित झालेला 'स्त्री' या भय आणि विनोद पटाचे आणखीन दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील या चर्चांवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते राज निधीमोरू आणि कृष्णा यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना यांच्या ‘स्त्री’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये निर्मिती केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८० कोटी रुपयांची कमाई केली होती.

हेही वाचा – कास्टिंग काऊचला दोनदा बळी पडली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

‘स्त्री’ चित्रपटाविषयी थोडक्यात

एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात भयासोबत विनोदाचीसुद्धा किनार होती. चित्रपटात भयाबरोबरच विनोदाचीसुद्धा योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. पण कथा जिच्यावर आधारित ती ‘स्त्री’ म्हणजेच ते भूत कोणाचे? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटात मिळत नाही. त्यामुळे चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांपुढे संभ्रम निर्माण करतो.

- Advertisement -

हेही वाचा – विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ चित्रपटाचा टीझर आऊट!

‘गो गोवा गॉन’चा सुद्धा सीक्वल

मागील काही दिवसांपासून ‘स्त्री’ चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर या चित्रपटात वरुण धवनची वर्णी लागल्याचीसुद्धा चर्चा रंगली होती. पण आता चित्रपटाचे निर्माते राज निधीमोरू आणि कृष्णा यांनीच ‘स्त्री’ चित्रपटाचे आणखी दोन भाग येतील म्हणून सांगितले. या चित्रपटाप्रमाणेच ‘गो गोवा गॉन’चा सुद्धा सीक्वल येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -