घरमनोरंजनठग्स ऑफ हिंदोस्तानचा शो रद्द, प्रेक्षकांचा मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ!

ठग्स ऑफ हिंदोस्तानचा शो रद्द, प्रेक्षकांचा मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ!

Subscribe

दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट बघण्यासाठी गर्दी केली. परंतु, मल्टीप्लेक्समध्ये गेल्यानंतर बराच वेळ चित्रपट सुरुच झाला नाही.

पुण्याच्या औंध येथील वेस्टएंड मॉलच्या मल्टीप्लेक्समध्ये सकाळी ९ वाजून १५ मिनिटांचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा ‘शो’ होता. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांची प्रमुख भूमिका आहे. आज या चित्रपटाचा पहिला शो होता. शिवाय, दिवाळीच्या सुट्ट्या देखील असल्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट बघण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, मल्टीप्लेक्समध्ये गेल्यानंतर बराच वेळ चित्रपट सुरुच झाला नाही. थोड्या वेळानंतर मल्टीप्लेक्सच्या कर्मचाऱ्यांनी हा शो रद्द झाल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही प्रेक्षकांनी मोठमोठ्याने शिवीगाळही केली.

हेही वाचा – मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याचा मार्ग मोकळा

- Advertisement -

‘या’ कारणामुळे ‘शो’ झाला रद्द

औंधच्या वेस्टएंड मॉलच्या मल्टीप्लेक्समध्ये आठ स्क्रीन आहेत. त्यापैकी एका स्क्रीनमध्ये हा प्रकार घडला. या मल्टीप्लेक्समध्ये सुमारे ४०० प्रेक्षकांची क्षमता आहे. ‘शो’ वेळेवर सुरु झाला नाही, म्हणून प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्स कर्मचाऱ्यांना विचारले. तेव्हा त्यांनी थोडा वेळ मागितला. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून मल्टीप्लेक्समध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रेक्षकांकडून थोडा वेळ मागितला. हा प्रकार तीन वेळा घडला. वेळ निघून गेल्यानंतरही शो सुरु झाला नाही, त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – मल्टिप्लेक्समधल्या खाद्यपदार्थांच्या किंमती ५० रुपयांच्या आत येणार!

- Advertisement -

मल्टीप्लेक्सने परतफेड केली?

प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यानंतर मल्टीप्लेक्सने काही जणांना ‘शो’च्या तिकिटांचे पैसे परत केले आहेत. तर काहींना दुसऱ्या ‘शो’चे तिकीट देण्यात आले आहे.


हेही वाचा – परळच्या पीव्हीआर मल्टीप्लेक्सला मनसेचा दणका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -