‘माधुरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

३० नोव्हेंबरला 'माधुरी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

Mumbai
The trailer of Madhuri movie is launched
'माधुरी' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच!

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकाताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत, अभिनेता शरद केळकर, संहिता जोशी आणि अक्षय केळकर हे कलाकारही दिसणार आहेत. स्वप्ना वाघमारे जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘माधुरी-वय विचारू नका’ हे चित्रपटाचे मजेशीर नावही चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर चित्रपट निर्मिती क्षेत्रात पर्दापण करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकर प्रस्तुत मुंबापूरी प्रोडक्शनने केली आहे.

काय असणार आहे ‘माधुरी’मध्ये?

ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार सोनाली ही एका तरुणीची भूमिका साकारत आहे. तरुणांना उद्भवणाऱ्या अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना कसे सामोरे जावे, याचे मार्गदर्शन या चित्रपटमधून होणार आहे. या ट्रेलरमध्ये सोनाली विविध प्रसंगामध्ये सामोरे जाताना दिसत आहे. त्याचबरोबर आपण सोनालीसोबत शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांनी साकारलेल्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो.

हेही वाचा – सोनाली बनली ‘माधुरी’, म्हणतेय ‘वय विचारु नका’

३० नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्यामार्फंत देण्यात येणाऱ्या संदेशाविषयी बोलताना मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “आयुष्यात परिस्थिती वाईट असली की आपण दुःखी होतो पण याचा अर्थ असा नाही की आपण हसणं विसरतो. आयुष्यात असे काही क्षण येतात पण आपण आयुष्य मात्र जगत राहतो. यावरच आधारीत एक संदेश आम्ही तरुणांना आणि पालकांना देऊ इच्छितो.” सोनाली कुलकर्णी आणि शरद केळकर यांच्या कामाविषयी मोहसिन यांना नेहमीच विश्वास होता. तसेच नवोदित अभिनेत्री संहिता जोशीची निवड करून तिच्या अभिनयावर विश्वास दाखवून त्यांनी या चित्रपटात तिला संधी दिली. अक्षय केळकर, विराजस, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते, गायक-गायिका या सर्वांनी ‘माधुरी’साठी मेहनत घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पेलल्या, असेही मोहसिन यांनी सांगितले.


हेही वाचा – माधुरीमध्ये ‘या’ भूमिकेत दिसणार शरद केळकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here