सोनाली म्हणते, उपचार रोगापेक्षा अधिक भयावह आणि वेदनादायक आहे

कर्करोग सारखा आजार भितीदायक होताच परंतु, त्यावरील उपचार हे अधिक वेदनादायक होते.

mumbai

गेल्या वर्षात सोनाली बेंद्रेने कर्करोग या सारख्या आजारावर मात केले. या उपचाराकरिता सोनालीला न्यूयॉर्कला जावे लागले होते. तिच्या लाखो चाहत्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे कर्करोगासारख्या मोठ्या आजारातून लवकर बरे होऊ शकले, असे तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसह प्रतिक्रीया देत शेअर केले आहे. डिसेंबर महिन्यात सोनाली मुंबईत परतली. हा प्रवास शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही तर या आठवणी वेगळ्याच आहे. Consortium of Accredited Health Organisation (CAHO)आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत तिने असे सांगितले की, कर्करोग सारखा आजार भितीदायक होताच परंतु, त्यावरील उपचार हे अधिक वेदनादायक होते.

”हा आजार लवकर ओळखता आला हीच मोठी गोष्ट आहे. कर्करोग हा कमी भितीदायक आहे. पण त्यावरील उपचार हे आजारापेक्षा अधिकच वेदनादायक आहे. हा आजार लवकरात लवकर निदर्शनात आला असता तर त्या वरील उपचाराचा खर्च देखील कमी आला असता. यासोबतच उपचाराच्या वेदनांचा सामना कमी करावा लागला असता.” असे तिने सांगितले. याविषयीची पोस्ट सोनालीने इंस्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली होती.

”माहिती, जागरूकता आणि कार्य. माझ्या आजाराच्या निदाना दरम्यान याबद्दल आवश्यक होते. मला खात्री आहे, प्रत्येकास प्रवेश करावा लागेल. या आजाराबद्दल आवश्यक अशा सुविधा परवडणाऱ्या किंमतीमध्ये देखील उपलब्ध आहे. परंतु, याबद्दल कोणाला अधिक माहिती नाही. तसेच, CAHOCON 2019 मध्ये डॉ. पुरी यांच्याशी संवाद साधत असताना याच समस्येवर संभाषण पुन्हा पुन्हा येऊन थांबत होते. या संवादाचा एक भाग बनल्याबद्दल तिने आभार देखील मानले.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here