घरमनोरंजनरंगकर्मींचा रंगोत्सव

रंगकर्मींचा रंगोत्सव

Subscribe

गेल्या दोन-चार दिवसांचा मागोवा घेतला तर हेवा वाटावा अशी कामगिरी मराठी रंगभूमीवरचे ज्येष्ठ तसेच नवकलाकार करत असल्याचे दिसते. काहीतरी निमित्त घेऊन हिंदी कलाकार एकत्र येत असतील आणि इंग्रजी महिन्यातील 31 डिसेंबरचा जागर करत असतील तर मराठी कलाकारांनीही एकत्र यायला पाहिजे. त्यासाठी या कलाकारांना गुढीपाडवा हा दिवस महत्त्वाचा वाटलेला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून होळीच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीत स्थिरावलेले रंगकर्मी एकत्र येऊ लागले आहेत. मराठी कलाकारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा दिवस सर्वच कलाकारांना महत्त्वाचा वाटलेला आहे. रंगकर्मीं होळी उत्सव काल साजरा झाला.

श्रीरंग गोडबोले, अमय खोपकर, अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, स्मिता तांबे, सायली संजीव, अवधूत वाडकर, मंदार वाडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने या उत्सवाला उपस्थित होते. चित्रपटाचे प्रमोशन त्यानिमित्ताने सहभागी कलाकारांशी भरभरून गप्पा आणि मनसोक्त संगीत-गायन-नृत्य याचा आस्वाद असे काहीसे ठरलेले होते. तशी व्यवस्थाही केली होती. पण गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता यंदाचा पोलीस बंदोबस्त चौकाचौकात अधिक चोख होता. त्याचा परिणाम याही रंगकर्मी उत्सवावर झाला. तीव्र आवाजाचे डीजे इथे वापरण्याला बंदी केली होती. त्यामुळे वाद्यवृंदाच्या संचात झालेल्या गाण्यांवर कलाकारांना समाधान मानावे लागले. कलाकारांनी स्वत:हून पुढाकार घेऊन नाचायला भाग पाडतील अशी गाणी इथे सादर केली. मतभेद विसरुन सर्वच कलाकार एकत्र येतात आणि आनंद घेतात हेच मुळात उत्साह निर्माण करणारे आहे. शिवाजी पार्कच्या बीएमसी ग्राऊंडवर हा सोहळा पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -