घरमनोरंजनमहाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत दिग्गजांचा नाट्यानुभव

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत दिग्गजांचा नाट्यानुभव

Subscribe

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे ५८वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०१८-२०१९ पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील सर्व नाटकांचे प्रयोग रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी चिंचवड येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. प्रेक्षकांना यात सहभागी नाटकांचा आनंद घेता यावा यासाठी अगदी माफक दरात म्हणजेच रु.१०-रु.१५ अशी या नाटकांची प्रवेश तिकीट ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेला १५ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून ३ डिसेंबर पर्यंत यात नाटकांचे सादरीकरण सुरु असल्याने प्रेक्षक याचा पुरेपुर आनंद घेऊ शकणार आहेत.

गुरुवार दि. १५ नोव्हेंबरला ’समाज सुधारक मित्र मंडळ’ नावाचे नाटक संतोष माकुर्डे दिग्दर्शित आकांशा बालरंगभुभी कोथरुड तर्फे सादर करण्यात आले होते. तर शुक्रवार दि. १६ नोव्हेंबर रोजी ’आय अ‍ॅग्री’ नावाचे नाटक माधव जोगळेकर लिखित आणि प्रणव राहुल दिग्दर्शित आमचे आम्ही टिम पिंपरी तर्फे सादर करण्यात आले होते.

- Advertisement -

१७ नोव्हेंबर ला अक्षय जोशी लिखीत आणि राजेश शिंदे दिग्दर्शित थ्रो- बॅक नावाच्या नावाच्या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर १९ नोव्हेंबर श्रीकांत प्रभाकर लिखित व दिग्दर्शित ’शौझिया’, २० नोव्हेंबर ’प्लॅनिंग’ ,२१- ’दि फिअर फॅक्टर’ , २२ – ’मलीका’, २३ तारखेला ’सेकंड इनिंग’, २४ – ’मालकीण मालकीण दार उघड’,२५ – ’बॅलेन्स शीट’, २७ – ’निरुपण’,२८ नोव्हेंबर ला अमोल पालेकर लिखीत आणि जहीर पटेल दिग्दर्शित ’पगला घोडा’, २९ – रुपबंदीश फाऊँडेशन तर्फे ’प्यादं’, ३० नोव्हेंबर ला ’कोण म्हणतं टक्का दिला?’, १ डिसेंबरला चं. प्र. देशपांडे लिखीत आणि पल्लवी जोशी दिग्दर्शित ’सामसूम’, २ डिसेंबर -’महाशुन्य’, तर ३ ला ’आरण्य’ अक्षय सावंत लिखित आणि भालचंद्र करंदिकर दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -