‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या ट्रेलरला Like Dislike चे बटण; पण Count मात्र नाही

सध्या बॉलिवूडमधील ‘घराणेशाही’ वादानंतर अनेक येऊ घातलेल्या चित्रपटांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या रागाला सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वी आलेल्या सडक २ चित्रपटाच्या ट्रेलरवरून त्याचा प्रत्यय आला. या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वाधीक डिसलाईक्स मिळाले होते. त्यामुळे आता निर्मात्यांनीच या ‘बॉयकॉट’ प्रकरणाचा धसका घेतला आहे. अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या ट्रेलरवर लाईक-डिसलाईक पर्यायच बंद करण्यात आला आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’च्या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच्या यु ट्यूबवरील ट्रेलरला लाईक-डिसलाईकचे बटण दिले असले तरी त्यावर क्लिक केल्यास काऊंट मात्र दिला गेलेला नाही. शिवाय हे बटण बंद असल्याने यावरच्या प्रतिक्रिया देखील पाहता येत नाहीत. त्यामुळे अक्षय कुमारही आता ‘बॉयकॉट’ला घाबरला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ‘जिथे कुठे असाल तिथेच थांबा, आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आता लक्ष्मी बरसणार आहे,’ असे कॅप्शन देत त्याने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

हेही वाचा –

ठाण्यातील पंचतारांकित टीपटॉप प्लाझा हॉटेलच्या जेवणात सापडली अळी