घरमनोरंजनहाऊसफुल ४: नाना पाटेकर यांना रिप्लेस करणार हे कलाकार

हाऊसफुल ४: नाना पाटेकर यांना रिप्लेस करणार हे कलाकार

Subscribe

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपानंतर अभिनेता नाना पाटेकर यांना 'हाऊसफुल ४' चित्रपटातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला.

अभिनेता नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाचा नाना पाटेकर यांना फटका बसला आहे. नाना यांना हाऊसफुल ४ चित्रपटातून डच्चू देण्यात आला आहे. नाना ऐवजी याचित्रपटात अभिनेता अनिल कपूर किंवा संजय दत्त दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान नाना पाटेकर यांना यावर कोणतेहे वक्तव्य केले नाही. मात्र फक्त आरोपामुळेच पाटेकर यांच्या हातून चित्रपट जाणे हे त्यांच्यासाठी एक मोठ नुकसान असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवल्या गेली आहे. पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्याचा अर्ज तनुश्रीने पोलिसांकडे केला आहे. त्यामुळे येत्या काळात पाटेकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान याच्यावरही लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले. यामुळे साजिद यांनीही चित्रपट सोडला असून त्यांच्या जागी फरहाद सामजी घेणार आहे. फरहाद याने हाऊसफुल ३ चे दिग्दर्शन केले होते. #metoo मोहीमेअंतर्गत हे सर्व आरोप लावण्यात येत आहेत.

प्रकरण न्यायालयात जाणार

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा गंभीर आरोप तनुश्री दत्ताने केला होता. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान नानांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शुटिंगदरम्यान तनुश्रीला चुकीच्या पद्धतीने हाथ लावला गेल्याचे तिने सांगितले. प्रथम प्रसार माध्यमांसमोर हे आरोप करण्यात आले होते. मात्र काही दिवसांनी ओशिवरा पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तनुश्रीची तक्रार नोंदवली असून हे प्रकरण आता न्यायालयात जाणार असल्याचे सांगितल्या जात आहे. दरम्यान तनुश्री दत्ताने नानापाटेकर यांची नार्को टेस्ट करण्याचा अर्ज पोलिसांकडे केला आहे.

- Advertisement -

या कलाकारांवरही आरोप

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर यांच्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये #metoo मोहीमेची लाट आली. मोहिमेअंतर्गत अनेक महिलांना बॉलिवूड कलाकारांवर आरोप लावले. यामध्ये बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ, जेष्ठ गायक कैलास खेर, दिग्दर्शक सुभाष घई, साजेद खान, लेखक पियूष मिश्रा आणि मॉलेड जुल्फी यांचा समावेश आहे. मात्र येत्या काळात आनखी काही कलाकारांचे नाव समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -